jaipur crime saam tv
देश विदेश

Jaipur Crime: तू मर्द नाहीस का? दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाला, पुढे जे घडलं ते खळबळ उडवणारं

Jaipur Crime News in Marathi: राजस्थानच्या जयपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणाने रागाच्या भरात त्याच्या मित्राला कारने चिरडल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Jaipur Latest News:

राजस्थानच्या जयपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणाने रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या मैत्रिणीला कारने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणाच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मंगेशला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या अवघ्या ३० तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश कुमार आणि राजकुमार जाट त्याच्या ४ ते ५ जणांसह बारमध्ये दारू पित होते. या सर्वांनी एकत्र दारू आणि जेवण केले. मंगेशने दारुच्या नशेत राजकुमारसोबत असलेल्या उमा सुथार या तरुणीला खूप काही बोलून गेला. यावरून मंगेश आणि राजकुमार यांच्यात वाद झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


नेमकं काय घडलं?

गौरव नावाच्या तरुणाने मंगेशला म्हटलं की, तू मर्द नाहीस का? तू त्याला काहीच उत्तर देत नाहीये. यानंतर मंगेश पेटून उठला. त्याने राजकुमारला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजकुमारने उमाला दूर घेऊन जाऊ लागला. त्याचवेळी मंगेशने कारमधून बॅट काढून दुसऱ्या कारची तोडफोड केली. यानंतर मंगेशने त्याची कार आणली. त्याने थेट राजकुमार आणि उमाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजकुमारने मोठी उडी मारत बाजूला झाला. त्यामुळे सुदैवाने वाचला. मात्र, उमा कारखाली चिरडली गेली. या घटनेत उमाचा मृत्यू झाला.

आरोपी कार घेऊन फरार

या घटनेनंतर मंगेशने प्रियसीला कारमध्ये बसवून फरार झाला. त्यानंतर पुढे त्याचा मित्र जितेंद्रच्या मदतीने दुसऱ्या कारने गंगानगर जिल्ह्याच्या दिशेने फरार झाला. मंगळवारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला.

पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी सुरु केली. त्यामुळे आरोपी मंगेश जयपूरला आला. जयपूरला आल्यावर पोलिसांनी आरोपी मंगेशला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या कारमधून ९ लाखांची रोकड जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT