Kolhapur Crime News: माझ्या मुलाच्या अंगात स्वामींचा अवतार असल्याचं सांगणं आईवडिलांना भोवलं, अंनिसच्या तक्रारीनंतर गुन्हा

Kolhapur News: त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदैवताची पूजा करा. स्वामींच्या नावाने प्रसाद वाटप करा. तसेच बाल स्वामींचे 5 गुरुवारी दर्शन घेतल्यास इच्छा पूर्ण होईल.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Crime News:

'आपला पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा स्वामींचा अवतार आहे. तुम्ही पाच गुरुवारी माझ्याकडे या!' अशा प्रकारे नागरीकांत अंधश्रध्दा पसरवणाऱ्या आई-वडीलांवर मंगळवारी रात्री शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्त जयंतीनिमित्त कदमवाडी रोड कसबा बावडा येथे महाप्रसादाचे वाटप ठेवले होते. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तेव्हा अनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांना कळविल्यानंतर या भोंदू जोडप्याचा बनाव रात्री उशिरा उघडकीस आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur Crime News
Wardha Crime: मध्यरात्रीचा थरार.. फार्म हाऊसवर दरोडा; एकावर शस्त्राने वार करत दागिने व सोयाबीनची ५५ पोते नेले लुटून

कोल्हापूर शहरातील कसबा बावडा -कदमवाडी रोडवर चौगले कॉलनीत इंद्रायणी हितेश वलादे, त्यांचे पती हितेश लक्ष्मण वलादे यांनी घरातच मंदिरासारखे वातावरण निर्माण केले होते. आपला पंधरा वर्षांचा मुलगा स्वामींचा अवतार आहे. तो जे बोलतो तसेच होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदैवताची पूजा करा. स्वामींच्या नावाने प्रसाद वाटप करा. तसेच बाल स्वामींचे 5 गुरुवारी दर्शन घेतल्यास इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारे लोकांमध्ये अंधश्रध्दा पसरवली होती.

या सर्व प्रकाराची माहिती अनिसच्या कार्यकर्त्या डॉक्टर मुक्ता दाभोळकर यांना कळाली होती. काल मुक्त दाभोळकर यांनी पुण्यातून सूत्र हलवलीत आणि कोल्हापूर पोलिसांना याची माहिती दिली. काल दत्त जयंती दिवशी या दाम्पत्याने लोकांकडून शिधा मागून जवळपास 5 हजार लोकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.

सायंकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी नागरीकांनी रांगा लावल्या होत्या. याबाबत अंधश्रंध्दा निर्मुलन पथकाकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलीसांचे पथक या ठिकाणी पोहोचले. वलादे दाम्पत्यास ताब्यात घेऊन त्यांना चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले.

शाहुपूरी पोलिसांनी या दांम्पत्याची कसून चौकशी केल्यानंतर पो.उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वलादे दाम्पत्यांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालणे व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापुरातील कसबा बावड्यात हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाही याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत भोंदू बाबाचे प्रकार उघडकीस आणून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी सांगितले आहे.

हितेश वालदे हे मूळचे गडचिरोलीचे असून त्यांच्या या लहान मुलांमध्ये स्वामी समर्थ प्रकट होतात अशी बातमी मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आलेली आहे. मुळातच या लहान मुलाला कोणतेच शालेय शिक्षण देण्यात आलेले नाही. केवळ भगवी वस्त्र घालून त्याला देवाचं रूप देण्याचा या दाम्पत्यांना प्रयत्न केलेला आहे.

या बालस्वमीचं भविष्य घडणाऱ्या त्याच्या आई- वडिलांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता होताना दिसत आहे. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जात असताना या जिल्ह्यांमध्येच मोठ्या प्रमाणात अनिष्ट प्रथा रूढ होत असल्याचे समोर येत आहे. आता पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर या प्रथांना मूठमाती देण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे.

Kolhapur Crime News
Mumbai Crime News : विवाहितेला सासरच्यांनी जिवंत जाळलं; भांडुपमधील घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com