Wardha Crime: मध्यरात्रीचा थरार.. फार्म हाऊसवर दरोडा; एकावर शस्त्राने वार करत दागिने व सोयाबीनची ५५ पोते नेले लुटून

Wardha News : वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्म हाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्म हाऊसवर जात असतात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेऊन असते.
Wardha Crime
Wardha CrimeSaam tv

चेतन व्यास 

वर्धा : वर्ध्यात एक दरोड्याची धक्कादायक घटना घडली असून सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी घातलेल्या (Wardha) या दरोड्यात ५५ पोते सोयाबीन व दागिने लुटून नेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी झालेल्या झटापटीत एकाच्या पोटात धारदार शास्त्राने (Crime News) भोसकल्याची सुद्धा घटना उजेडात आली असून जखमीला तातडीने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. (Maharashtra News)

Wardha Crime
Latur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केली आईची हत्या; लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्म हाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्म हाऊसवर जात असतात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेऊन असते. दरम्यान काल रात्री ते आपल्या शेतातील फार्महाऊसवर हजर असतांना मध्यरात्रीच्या सुमारास दोन जणांनी त्यांचा दरवाजा ठोठावला. मुलाने दरवाजा उघडताच आलेल्या दोघांनी त्यांना धमकावणे सुरू केले. ही झटापट सुरू असतानाच (Robbery) आणखी पाच ते सहा जण अचानक तेथे आले. त्यांनी त्यांना मारण्यास व धमकविण्यास सुरुवात केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha Crime
Shirdi News : साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत अलोट गर्दी; ३१ डिसेंबरला रात्रभर मंदिर राहणार खुले

झटापटीत चाकू मारला 

यावेळी फार्महाऊस वर नारायण पालिवाल (वय ८०) त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल (वय ५०) व हरिकुमारी पालिवाल (वय ७०) हे हजर होते. या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला व त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले. सोबतच तिथे ठेवलेले ५५ पोते सोयाबीन लंपास केले. रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता.

जखमी अवस्थेतच गाडी नेली चालवत 
पालिवाल कुटूंब हे चाकी वाहनाने आपल्या फार्महाऊसवर आले होते. दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालिवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहचू नये; यासाठी यांच्या चारचाकी वाहनाच्या चाकातील हवा सोडली. कुणाला संपर्क करू नये, यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून नेले. पण पालिवाल कुटुंबाने मोठे धाडस दाखवून हवा सोडलेल्या वाहनानेच पोलीस ठाणे गाठून आपल्या सोबत घडलेली हकीकत सांगितली. विशेष म्हणजे ज्या मुलावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला त्याच जखमी मुलाने वाहन चालवत नेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com