Jaipur Hit And Run Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Jaipur Hit And Run Accident News : जयपूर महामार्गावर बेशिस्त थार चालकाने १८ वर्षीय मुलीला धडक दिली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून चालक फरार आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Alisha Khedekar

  • जयपूर महामार्गावर हिट अँड रनची धक्कादायक घटना

  • थार चालकाच्या धडकेत १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

  • अपघातानंतर चालक फरार; CCTV व्हिडिओ समोर

  • बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी

जयपूरमधून हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. एका बेशिस्त थार चालकाने १८ वर्षीय मुलीला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटना जयपूर महामार्गावर घडली असून थार चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव अनाया शर्मा (१८ वर्षे ) असे आहे. अनाया बुधवारी सकाळी तिच्या बहिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यादरम्यान जयपूर महामार्गावर समोर वेगाने येणाऱ्या थारने तिला धडक दिली. या धडकेत अनाया जागीच बेशुद्ध झाली. शिवाय गंभीर जखमी सुद्धा झाली. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र जखमी मुलीला मदत करायची सोडून थार चालक घटनास्थळावरून पसार झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार घेत मृत्यूला झुंज देण्यात अनाया अयशस्वी ठरली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. अनाया हवाई दलाच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होती आणि देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहत होती.

धक्कादायक म्हणजे थार चालकाने पुढे असलेल्या दुसऱ्या वाहनालाही धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन थार ताब्यात घेतली आणि आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली. जवळील सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याची ओळख पटवून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अपघातामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच बेशिस्त आणि वेगाने वाहन चालवण्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, फरार चालकाला लवकरच अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान अनायाच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेबद्दल आणि वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांच्या जबाबदारीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ नाशिकच्या दिशेने

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Crime News: नवऱ्याची हत्या केली नंतर मृतदेहाजवळ बसून पत्नीनं पाहिला पॉर्न व्हिडिओ; धक्कादायक घटना

Hair Care: केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर का लावायचा असतो?

धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

SCROLL FOR NEXT