Maruti cars
Maruti cars google
देश विदेश

जबरा काम, शॉल्लिड 'इनाम'!, IT कर्मचाऱ्यांना कंपनीनं भेट दिल्या १०० कार

नरेश शेंडे

चेन्नई : कोरोनाकाळात (corona pandemic) अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आणि अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली. मात्र, काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर कायम ठेवत त्यांना दिलासा दिल्याचेही अनेक उदाहरणं समोर आली आहेत. चेन्नईतील (Chennai) अशाच एका आयटी बेस्ड कंपनीने (IT Based company) कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 'आयडीयाज टू आयटी' (ideas2IT) या कंपनीचा विस्तार करण्यात दहा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारुती सुझूकीच्या तब्बल १०० कार (Maruti suzuki 100 car) गिफ्ट दिल्या आहेत.

याबाबत कंपनीचे मार्केटिंग हेड हरी सुब्रमण्यम यांनी एयनआयला दिलेली माहिती अशी की, "दहा वर्षांपासून अधिक काळ काम करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना 'आयडीयाज टू आयटी' कंपनीकडून १०० कार गिफ्ट करत आहोत. आमच्याकडे ५०० कर्मचारी काम करतात त्यामुळे कंपनीला फायदा होण्यास मदत होते. कंपनीला होणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांनाही संपत्ती देणे, हे आमचं उद्दीष्ट असतं. तसंच अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टींसाठी कंपनी भविष्यात नेहमीच पुढाकार घेईल, असं कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गायत्री विवेकानंदन यांनी म्हटलं आहे.

"आयडीयाज टू आयटी ही कंपनी हाय एंड प्रोडक्ट इंजिनीयरिंग फर्म असून तिचे मुख्यालय चैन्नईत आहे. कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि यश मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं नेहमीचं सहकार्य आणि मोलाचं कार्य असतं. फेसबुक, ब्लुमबर्ग, मायक्रोसॉफ्ट, मोटोरोला अशा बड्या कंपन्यांना सॉफ्टवेयरची डिलिव्हरी या कंपनीकडून केली जाते." अशी माहिती पीटीआयने दिली आहे. तंसंच गिफ्ट मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने असं सांगितलं की, कंपनीकडून गिफ्ट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कपंनीच्या अशा अनेक प्रसंगी कर्मचाऱ्यांना गोल्ड कॉईन, कार, आयफोन असे मोठे गिफ्ट मिळतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Today's Marathi News Live: भाजपच्या मुलुंड कार्यालय तोडफोड प्रकरण, शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video

kiara Advani : पागल करते कियाराची मोरनीशी चाल

SCROLL FOR NEXT