Russia Ukraine war: यूक्रेनमध्ये रशियाचं मोठं नुकसान; पुतिन संतापले, १५० गुप्तहेरांना हटवलं

Russia President Vladimir Putin News, Russia Ukraine war News Updates
Russia President Vladimir Putin News, Russia Ukraine war News Updatesgoogle

मॉस्को : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला (Russia and Ukraine war) ४८ दिवस झाल्यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांना मनासारखं यश मिळवता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर असा दावा केला जात आहे की, युक्रेनमध्ये अपयशी ठरलेल्या सिक्रेट एजंसी एफएसबीच्या (FSB Secret Agent) तब्बल १५० एजंट्सला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले असून अनेकांना गजाआड (Agent Arrests) केले आहे, असा दावा शोधपत्रकारिता करणारी न्यूज एजंसी बेलिंगकॅटने त्यांच्या रिपोर्टमध्ये केला आहे. हे सर्व एजंट रशियातील एका बदनाम सिक्रेट एजंसी एफएसबीचे असल्याची चर्चा आहे. या एजंसीला सोवियत संघाच्या कालखंडातील सिक्रेट एजंसी केजीबीच्या (kgb Agency) जागेवर घेतलं होतं. तसंच पुतिन केजीबी या एजंसीचे एजंटही राहिले होते. (Russia Ukraine war News Updates)

Russia President Vladimir Putin News, Russia Ukraine war News Updates
Kirit Somaiya : सोमय्यांना सलग दुसरा 'झटका'; कुटुंबीय आणखी अडचणीत

याबाबतचं सविस्तर वृत्त असं की, पुतिन यांनी ज्या एजंट्सला नोकरीवरुन काढून टाकलं आहे ते पाचव्या सर्व्हिसमधील असल्याचं बोललं जात आहे. ज्यावेळी पुतिन एफएसबीचे डायरेक्टर होते तेव्हा या डिव्हिजनची स्थापना १९९८ मध्ये झाली होती. या डिव्हिजनचं काम पूर्वीच्या सोवियत संघाच्या अंतर्गत देशांतील हेरगिरी करण्याचे होते. पाचव्या सर्विसचे प्रमुख कर्नल जनरल सर्गेई बेसेदा अशा लोकांमध्ये शामिल होते, ज्यांना नजरकैद करण्यात आले होते.

रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाला खोटी सूचना दिली

या एजंट्सनी युक्रेनबद्दलची खोटी माहिती रशियाच्या कार्यालयाला दिली होती. त्यामुळे रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वीच नोकरीवरुन काढून टाकले होते. असा दावा बैलिंगकॅटचे डायरेक्टर क्रिस्टो ग्रोजेव यांनी केला आहे. ग्रोजेव यांनी दिलेली माहिती अशी की, जास्त लोकांना अटक केलेली नाही. मात्र ते आता एफएसबीसाठी काम करणार नाहीत. सिक्रेट एजंसीने पुतिन यांना असं सांगितलं की, जर रशियन सैनिक हल्ला करणार असतील तर युक्रेनमधील लोकं त्यांचे स्वागत करतील. ज्यामुळे जलगतीने विजय मिळवता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com