मुंबई : 'सेव्ह विक्रांत'च्या (Save Vikrant) निधीत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि कुटुंबीयांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा 'झटका' मिळाला आहे. सोमय्या यांचा पुत्र नील सोमय्यांचा (Neil Somaiya) अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. काल, सोमवारीच किरीट सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता.
सेव्ह विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावली होती. मात्र ते हजर झाले नाहीत त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र काल कोर्टाने किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज नाकारला होता तर आज नील सोमय्यांचा अर्ज देखील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
दरम्यान, आज किरीट सोमय्यांच्या कार्यालय आणि घरांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आले होते किरीट सोमय्या उपस्थित नसल्यामुळे त्यांनी सोमय्या यांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून यांच्या घरावर नोटीसही चिटकवली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.