भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने नवा विक्रम केला आहे. इस्त्रोने आज सकाळी ६.२३ मिनिटांनी GSLV-F15 आकाशात प्रक्षेपित केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून NVS-02 सॅटेलाइला घेऊन जाणारे GSLV-F15 यान लाँच केले आहे. इस्त्रोची ही खूप मोठी कामगिरी आहे.
देशातील अंतरिक्ष केंद्रातून हे १००वे प्रक्षेपण आहे. इस्त्रोचे हे मिशन यशस्वी झाले आहे.यामुळे इस्त्रोने अंतराळात नवीन उंची गाठली आहे. (ISRO Launch GSLV-F15)
GSLV-F15 मिशन यशस्वी झाल्यावर केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्त्रोचे कौतुक केले आहे. श्रीहरीकोटा येथून १०० वे ऐतिहासिक प्रेक्षपण झाले. यासाठी इस्त्रोला खूप शुभेच्छा. या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांच्यासोबत काम केले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. इस्त्रोने GSLV-F15 / NVS-02 मिशन यशस्वी करुन पुन्हा एकदा भारताचे नाव मोठे केले आहे.
GSLV-F15 हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलचे (GSLV) 17 वे मिशन होते. स्वदेशी क्रायो स्टेजसह ११ वे उड्डाण होते. स्वदेशी क्रायो स्टेजसह हे GSLV चे ८ वे ऑपरेशनल उड्डाण होते.
इस्त्रोची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. इस्त्रोने याबाबत आपल्या निवेदनात म्हटलंय की, GSLV-F15 NVS-02 सॅटेलाइला जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना हे सॅटेलाइट लाँच होणार पाहायला मिळाले. १०० वे ऐतिहासिक उड्डाण करुन भारताने अंतराळातील कामगिरीत नवीन उंची गाठली आहे. हे एक खूप चांगले पाऊल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.