India Launches EOS-05 Satellite Saam TV
देश विदेश

ISRO : चीन-पाकिस्तानची धाकधूक वाढली! भारताने अवकाशात सोडला 'नवा डोळा'; अर्थ इमेजिंग सॅटेलाइट EOS-05 बाबत मोठी अपडेट

EOS-05 satellite launch by ISRO latest update : इस्रोने श्रीहरिकोटाहून GSLV-F17 रॉकेटद्वारे अत्याधुनिक EOS-05 अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे भारताची पृथ्वी निरीक्षण, सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान अंदाजाची क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

Namdeo Kumbhar

India Launches EOS-05 Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा अवकाशात इतिहास रचत यश मिळवले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 'GSLV-F17' या शक्तिशाली रॉकेटचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. हे रॉकेट अत्याधुनिक 'EOS-05' (अर्थ इमेजिंग सॅटेलाइट) उपग्रह घेऊन अवकाशात झेपावले आहे. या नव्या सॅटेलाइटमुळे भारताची सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान अंदाजाची क्षमता प्रचंड वाढणार आहे. इस्त्रोच्या या यशस्वी उड्डाणामुळे देशभरातून शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे.

या ऐतिहासिक प्रक्षेपणावर आनंद व्यक्त करताना इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन म्हणाले, जीएसएलव्ही-एफ१७ (GSLV-F17) यानाने प्रगत भू-प्रतिबिंबन पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'ईओएस-०५' ला त्याच्या निर्धारित आणि आवश्यक कक्षेत अत्यंत अचूकतेने प्रस्थापित केले आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना जीएसएलव्ही मोहिमेचे संचालक थॉमस कुरियन म्हणाले, "हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. जीएसएलव्हीने जीटीओ (GTO) किंवा सब-जीटीओ कक्षेत प्रक्षेपित केलेला 'ईओएस-०५' हा आतापर्यंतचा सर्वात जड उपग्रह ठरला आहे."

ते पुढे म्हणाले की, जीएसएलव्हीने आपली १९ वी मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली. या मोहिमेद्वारे अवकाशात पाठवण्यात आलेला ईओएस-०५ हा उपग्रह रिअल-टाइम (तत्काळ) इमेजिंग करण्यास सक्षम असून, त्याची रचना अत्यंत अद्वितीय आहे.

ईओएस-०५ (EOS-05) उपग्रहाची प्रमुख वैशिष्ट्ये

'ईओएस-०५' हा अत्याधुनिक उपग्रह पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर उंचीवर कार्यरत राहील. तेथून संपूर्ण भारताचे अखंड आणि स्पष्ट विहंगम दृश्य (Panoramic View) प्रदान करण्यासाठी या उपग्रहाची विशेष रचना करण्यात आली आहे.

या मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या 'जीएसएलव्ही-एफ१७' (GSLV-F17) या प्रक्षेपकाची उंची ५१.७ मीटर आहे. उड्डाणाच्या वेळी या यानाचे एकूण वजन ४२०.५ टन इतके होते. यामुळे हे यान भारताच्या सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली कार्यरत प्रक्षेपण यानांपैकी एक ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

Shocking : नवी मुंबई हादरली! स्कूल बसमध्ये ३ वर्षीय चिमुकलीसोबत चालकाचं विकृत कृत्य ; अंगाला हात लावला अन्...

Daily tea intake: 1 दिवसाला किती कप चहा प्यायला पाहिजे? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Pink VS White Guava: गुलाबी की पांढरा पेरू? दोघांपैकी कोणता आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या!

Kidney Damage : सकाळी उठताच शरीरात जाणवणारे 'हे' ५ बदल, किडनी खराब होण्याचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT