Aditya L1 Mission Sun Photos Saam Tv
देश विदेश

Aditya L1 Mission Sun Photos: धगधगत्या सूर्याचे फुल-डिस्क फोटो पहिल्यांदाच कॅमेरात कैद, आदित्य L-1 मोहीमची लक्षवेधी कामगिरी

Aditya L1 Mission: धगधगत्या सूर्याचे फुल-डिस्क फोटो पहिल्यांदाच कॅमेरात कैद, आदित्य L-1 मोहीमची लक्षवेधी का

Satish Kengar

Aditya L1 Mission Sun Photos:

चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोच्या पहिल्या सूर्य मोहिमेतील आदित्य एल-1 नेही लक्षवेधी कामगिरी केली आहे. अंतराळ यानावर असलेल्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) उपकरणाने 200-400 nm तरंगलांबी श्रेणीतील सूर्याचे पाहिले फुल-डिस्क फोटो यशस्वीरित्या कॅप्चर केले आहे. SUIT विविध वैज्ञानिक फिल्टर्सचा वापर करून या तरंगलांबी श्रेणीतील सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरचे फोटो कॅप्चर केले अहेत.

इस्रोने SUIT ने क्लिक केलेले फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये सूर्य वेगवेगळ्या रंगांच्या चित्रांमध्ये दिसतो. माहिती देताना ISRO ने म्हटले आहे की, "SUIT पेलोड 20 नोव्हेंबर 2023 रोजी लॉन्च करण्यात आले. यशस्वी प्री-कमिशनिंग टप्प्यानंतर, दुर्बिणीने 6 डिसेंबर 2023 रोजी त्याचे पाहिले फोटो क्लिक केले. अकरा भिन्न फिल्टर वापरून घेतलेले हे अभूतपूर्व फोटो पहिल्यांदाच पूर्ण रिझोल्यूशन दाखवतात.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

SUIT च्या निरीक्षणांमुळे शास्त्रज्ञांना मॅग्नेटो-सौर वातावरणाच्या डायनॅमिक कपलिंगचा अभ्यास करण्यात मदत होईल आणि पृथ्वीच्या हवामानावर सौर किरणोत्सर्गाचा प्रभाव रोखण्यात मदत होईल.  (Latest Marathi News)

दरम्यान, या वर्षी 2 सप्टेंबर रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (ISRO) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 11.50 वाजता ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनवर (PSLV) वर भारताची पहिली सूर्य मोहीम, आदित्य-L1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केली.

सूर्याविषयी अधिक माहिती देणे हा त्याचा उद्देश आहे. इस्रोसाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. याआधी इस्रोने भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेतही मोठे यश मिळवले होते. ऑगस्टमध्ये, अवकाश संस्थेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इतिहास रचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT