Israeli soldiers face serious allegations after the Justice Ministry revealed a wartime smuggling network linked to Gaza Saam Tv
देश विदेश

युद्धकाळात सैनिकांनी केली देशाशी गद्दारी, हमासला विकले आयफोन आणि बॅटरी

Israeli Soldiers Accused Of Smuggling iPhones To Hamas During War: इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं गाझामध्ये एका मोठ्या बेकायदेशीर तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय. युद्धाच्या वेळी इस्रायलच्या सैनिकांनी हमासला आयफोन आणि बॅटरी विकल्याचा आरोप आहे. युद्धकाळात गाझामध्ये तस्करीचं प्रमाण वाढलं होतं, असं सांगत इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं आपल्याच सैनिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.

Saam Tv

इस्रायलनं हमासविरोधात केलेली कारवाई साऱ्या जगानं पाहिली. या युद्धात गाझा पट्टी बेचिराख झालीय. कित्येक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या युद्धात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं एक आपल्याच सैनिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलंय. इस्रायली सैनिक आणि राखीव दलाच्या सदस्यांनी युद्धादरम्यान गाझामध्ये लाखो डॉलर्सच्या वस्तूंची तस्करी करून कायदा मोडला असा आरोप करण्यात येतोय.. तसच शत्रू संघटना हमासलाही मदत केल्याचा आरोप होतोय.

इस्रायली सैनिकांकडून हमासमध्ये वस्तूंची तस्करी?

इस्रायली अभियोक्त्यानं जारी केलेल्या निवेदनात आरोपींनी सिगारेट, आयफोन, बॅटरी, कम्युनिकेशन केबल्स आणि कारचे सुटे भाग यासारख्या वस्तू गाझामध्ये तस्करी केल्या. हा माल हमास आणि त्यांच्या सैनिकांपर्यंत पोहोचू शकतो हे जाणून त्यांनी वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप आहे. इस्रायल-गाझा सीमेवरील कमकुवत देखरेखीमुळे ही तस्करी शक्य झाली. हमासला फायदेशीर म्हणून अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती. मात्र इस्रायलच्या सैनिकांनी पैसे कमवण्यासाठी तस्करी करून माल विकला.

इस्रायलची देशांतर्गत गुप्तचर संस्थाचे प्रमुख डेव्हिड झिनी यांचा भाऊ बेझालेल झिनी यांचं नाव सरकारी वकिलांनी घेतल्यावर या खटल्याला आणखी गती मिळालीय. लाचेच्या बदल्यात त्यानं सिगारेट तस्करीला मदत केल्याचा आरोप आहे. बेझालेच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान अभियोक्ता कार्यालयानं आरोपींची वाहनं, स्थावर मालमत्ता आणि रोख रक्कम यासह इतर मालमत्ता जप्त करण्याची मागणी केलीय. या खटल्यामुळे इस्रायली सुरक्षा व्यवस्था आणि युद्धकाळातील भ्रष्टाचार जगासमोर आलाय. त्यामुळे गाझा उद्ध्वस्त करणाऱ्या इस्रायली सैनिकांचा भ्रष्टाचारी चेहराही उघड झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Meaning: स्वप्नात या 7 गोष्टी दिसतायेत? श्रीमंत होण्याचे हे आहेत संकेत, पैशाची तंगीही होणार दूर

Maharashtra Live News Update: अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना

कर्ज मागताना आता लाज वाटते, पंतप्रधानांचा कबूलनामा

Mumbai Crime News: शौचलयात गेली अन् हाताची नस कापली; विद्यार्थिनीचं कृत्य पाहून पोलीसही चक्रावले

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता वाढणार

SCROLL FOR NEXT