israel attacks on iran intel ministry HQ social media
देश विदेश

Iran–Israel war : इस्रायलचा इराणच्या मंत्रालयावर एअरस्ट्राइक, एका मंत्र्यासह गुप्तचर विभागातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू

Iran–Israel war : इस्रायलने इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात एका मंत्र्यासह हेरगिरी विभागातील अनेक बडे अधिकारीही मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसच्या दाव्यानुसार, ऑपरेशन रोरिंग लायनच्या अंतर्गत इराणच्या गुप्तचर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार करण्यात आले. आयडीएफच्या माहितीनुसार, हा हल्ला गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे करण्यात आला. तेहरानस्थित मंत्रालयावरही हल्ला करण्यात आला.

अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर तिसऱ्या दिवसानंतरही युद्धभडका कायम आहे. दोन्हींकडून क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेस (IDF) च्या दाव्यानुसार, इराणच्या गुप्तचर विभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सैन्यानं टार्गेट केलं होतं. आयडीएफच्या अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई ऑपरेशन रोरिंग लायन अंतर्गत करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातच या अधिकाऱ्यांना टिपलं. मृतांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच इराणच्या मंत्रालयातील उपमंत्री सैयद यह्या हमिदी हे देखील या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा आयडीएफने केला आहे.

इराणच्या गुप्तचर विभागाच्या उपमंत्र्यांचा मृत्यू

आयडीएफच्या माहितीनुसार, इस्रायलमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या गुप्तचर मंत्रालयाचे उपमंत्री सैयद यह्या हमिदी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हमिदी हे यहुदी, पाश्चिमात्य देशांशी संबंधित नागरिक आणि विदेशांत सरकारविरोधातील यंत्रणांना टार्गेट करणाऱ्या कारवायांचे नेतृत्व करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याशिवाय गुप्तचर मंत्रालयातील हेरगिरी विभाग प्रमुख जलाल पूर हुसैन हे देखील या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला.

इस्रायल सैन्याच्या दाव्यानुसार, या कारवाईत अन्य वरिष्ठ अधिकारीही टार्गेटवर होते. तसेच इस्रायलच्या वायूसेनेने तेहरानस्थित इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्यालयावरही हल्ला चढवला. आयडीएफनुसार, ही कारवाई विभागीय सुरक्षा आणि देशातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन केली आहे. मात्र, याबाबत इराणकडून कोणत्याही विभागाकडून तात्काळ अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यात अलीकडच्या काही घटनांनंतर संघर्ष अधिकच चिघळला आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या दाव्यानंतर त्याला अद्याप अधिकृत दुजोरा कुणीही दिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kideny Health: किडनीचा त्रास आहे? उन्हाळ्यात ही 5 फळे खाण्यापूर्वी 10 वेळा विचार करा

Heart Attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी ४८ तास अगोदर शरीर देतं हे संकेत, वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या नेर तालुक्यात उष्माघाताने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Mango Price : आनंदवार्ता! हापूसचे दर घसरले, १ डझन पेटीची किती आहे किंमत? जाणून घ्या

Aadhaar Card Update: आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

SCROLL FOR NEXT