Israel-Hamas War Saam Digital
देश विदेश

Israel-Hamas War: २४ तासात गाझा शहर खाली करा, इस्राइलचा नागरिकांना इशारा

United Nations: स्थलांतराचा दिलेला आदेश मागे घेण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्राने इस्राइलला केलं आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Israel-Hamas War

इस्राइलच्या सैन्याने ११ लाखांपेक्षा अधिक गाझावासियांसह संयुक्त राष्ट्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत दक्षिण भागात निघून जाण्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्राने यावर चिंता व्यक्त केली आहे. इस्राइल-गाजा सिमेवर इस्राइलने मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव सुरू केल्यामुळे हमासचे नामोनिशाण मिटविण्यासाठी पेटून उठलेले इस्राइल सरकार कोणत्याही क्षणी जमिनीवरील हल्ला तीव्र करू शकते. त्यामुळे संपूर्ण अरबस्तानात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

हमास चे आतंकवादी गाझा शहरातील बंकरमध्ये लपून हल्ले करत असून नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यापासून लांब राहावं. येत्या काही तासात इस्राइल मोठी कारवाई करणार आहे. याचा नागरिकांना त्रास होऊ नये आणि आतंकवाद्यांविरोधात कारवाई करताना अडचणी येऊ नयेत यासाठी दक्षिणेकडे जाणं योग्य ठरेल, असं इस्राइलने म्हटलं आहे.

संभाव्य विनाशकारी स्थितीतून बाहेर पडायचं असेल तर गाझाच्या नागरिकांना स्थलांतराचा दिलेला आदेश मागे घेण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्राने इस्राइलला केलं आहे. दरम्यान इस्राइलच्या आदेशाचा परिणाम संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी, शाळा, हॉस्पिटलवरही पडू शकतो, त्यामुळे संयुक्त राष्ट्रानेही आपलं कामकाज दक्षिणेत स्थलांतर केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

SCROLL FOR NEXT