Pro-Palestine protestors march in New York City SAAM TV
देश विदेश

Israel-Hamas War : शहर सोडून चालले होते, तितक्यात... इस्राइलचा गाझामध्ये एअर स्ट्राइक, ७० मृत्युमुखी

Israel-Hamas War News : गाझा सोडून जाणाऱ्या नागरिकांवर इस्राइलनं हवाई हल्ला केल्याचा दावा हमासकडून केला जात आहे.

साम ब्युरो

Israel-Hamas War News :

इस्राइल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा आठवा दिवस आहे. हमासने लेबनानवरून पाठवलेले दोन ड्रोन इस्राइलच्या हवाई दलाकडून पाडण्यात आले. तसेच इस्राइलचं सैन्य गाझापट्टीत घुसले आहेत.

गाझाच्या उत्तरेतील क्षेत्रात राहणारे हजारो नागरिक कथितरित्या दक्षिणेकडील क्षेत्रात स्थलांतरित झाले आहेत, असा दावा 'ओसीएचए'ने केला आहे. तर गाझा सोडून जाणाऱ्या नागरिकांवर इस्राइलनं हवाई हल्ला केला. त्यात ७० नागरिक मृत्युमुखी पडले, असा दावा हमासने केला आहे.(Latest Marathi News)

हमासने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. इस्राइलच्या हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये गाझा शहरातून पलायन करणाऱ्या किमान ७० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे, असे त्यात म्हटले आहे.

हमासच्या या दाव्यावर इस्राइलकडून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, वेस्ट बँकमध्ये शुक्रवारी १६ पॅलिस्टिनी नागिरकांची हत्या झाली आहे.

आतापर्यंत ३२०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

गाझापट्टीवर हमासशी संबंधित ठिकाणांवर इस्राइलच्या हवाई दलाकडून हल्ले सुरूच आहेत. इस्राइल आणि हमासमध्ये गेल्या शनिवारी म्हणजेच ७ ऑक्टोबरला युद्ध सुरू झाले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलमधून घुसून अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतला होता, असा दावा करण्यात येत आहे. युद्धाचा आठवा दिवस असून, यात आतापर्यंत ३२०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.

इस्राइलमधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १३०० हून अधिक आहे. तर गाझापट्टीवर १९०० हून अधिक पॅलिस्टिनींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

लेबनान सीमेवर इस्राइल आक्रमक

इस्राइलच्या सुरक्षा दलांच्या माहितीनुसार, ड्रोन पाडल्यानंतर शुक्रवारी इस्राइलचे ड्रोन, तोफखाने आणि टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. उत्तरेकडील सीमेवरील सैन्यांच्या अनेक चौक्यांवर गोळीबार केला.

इस्राइलच्या सैन्याकडून लेबनानस्थित हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेला लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत १३०० हून अधिक इस्राइलच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT