Israel-Hamas war: हमासशी लढण्यासाठी इस्राइलनं वापरलं अनोखं तंत्र; गाझा पट्टीला वेढा घालण्याचा दिला आदेश

Israel-Palestine War: इस्राइल आणि हमासमधील युद्ध चालू असून दोघांकडून रॅकेट बॉम्बचा वर्षाव केला जात आहे.
Israel-Hamas war:
Israel-Hamas war:Saam Tv(Social Media)
Published On

Israel-Palestine War:

इस्राइल आणि हमासमधील युद्ध चालू असून दोघांकडून रॅकेट बॉम्बचा वर्षाव केला जात आहे. आतापर्यंत या युद्धात इस्त्राइलच्या ८०० नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्राइलवर तीन्ही मार्गानं हल्ला चढवणाऱ्या हमासला पराभूत करण्यासाठी इस्त्राइलने एक अनोखं शस्त्र उगारले आहे. (Latest News)

हमासच्या दहशतावाद्यांनी इस्त्राइलच्या नागरिकांना बंधक बनवलंय आहे. हमासला त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी इस्राइलने गाझापट्टीला वेढा घालण्याचा आदेश दिला. इस्त्राइलच्या संरक्षण मंत्र्यांनी हे आदेश दिलेत. बीरशेबा येथे आयडीएफ साऊथर्न कमांडच्या आढावा घेतल्यानंतर संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी हा आदेश दिलाय. गाझा पट्टीतील वीज, अन्न पुरवठा, इंधनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

आपण मानवी रुपी प्राण्याशी संघर्ष करत आहोत. त्यांना त्याच्याप्रमाणेच उत्तर द्यावे लागेल, असंही संरक्षण मंत्री म्हणालेत. दरम्यान तेथील स्थानिक माध्यमांच्या मते, शनिवारच्या हल्ल्यानंतर ७०० हून अधिक इस्राइल नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्रायल सरकारच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात २ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्राइली पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी प्रेस कार्यालयाने सांगितले की, गाझामधील ओलीसांची संख्या १०० पेक्षा जास्त होती. इस्त्राइलच्या सैनिकांनी गाझाच्या सीमेवर नियंत्रण मिळवलंय. इस्राइलचे संरक्षण दलाचे प्रमुख प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, इस्राइली सैन्याने गाझा सीमेवरील सर्व शहरांवर नियंत्रण मिळवले आहे. गेल्या काही तासांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कुठे-कुठे चकमक होत आहेत. हे ठिकाणं शोधण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

Israel-Hamas war:
Israel-Palestine Tension : इस्राइल-हमास संघर्षात १०००हून अधिक बळी; कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com