Taj Mahal Saam tv
देश विदेश

Taj Mahal : ताजमहल वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी? प्रेमाच्या प्रतिकावर कोणाचा मालकी हक्क? वाचा सविस्तर

Taj Mahal News : ताजमहल वक्फ बोर्डाची कोणाची प्रॉपर्टी, यावरुन चर्चा सुरु झाली आहे. आगरा येथील प्रेमाच्या प्रतिकावर कोणाचा मालकी हक्क? जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

ताजमहल हे जगभरातील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. ताजमहल या स्थळाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून ताजमहलवर कोणाचा मालकी हक्क आहे, यावरून चर्चा सुरु झाली आहे. ताजमहलच्या मालकी हक्कावरून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे. खरंतर उत्तर प्रदेशच्या वक्फ बोर्डाने ताजमहलवर दावा केल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली होती. या दाव्यानंतर वक्फ बोर्ड आणि भारत सरकारमधील वाद कोर्टात पोहोचला होता.

फिरोजाबादमधील व्यापारी इरफान बेदर यांनी १९९८ साली ताजमहलाच्या मालकीवरून वक्फ बोर्डात धाव घेतली होती. त्यांनी वक्फ बोर्डात जाऊन ताजमहलला वक्फ बोर्डाचा प्रॉपर्टी म्हणून घोषित करण्याची मागणी केली. ताजमहलचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे ताजमहलास वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी मानली पाहिजे. त्यानंतर वक्फ बोर्डाने ताजमहलचे व्यवस्थापन करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नोटीस पाठवली.

इरफान बेदर यांनी २००४ साली इलाहाबाद हायकोर्टात पोहोचून कायदेशीर मदत मागितली. वक्फ बोर्डाने २००५ साली ताजमहलला आमची प्रॉपर्टी असल्याचं म्हटलं. वक्फ बोर्डाच्या घोषणेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार, सुप्रीम कोर्टाने वक्फ बोर्डाकडे पुरावे मागितले. शहाजहाँ यांनी स्वत: ताजमहल वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी घोषित केली होती, अशी घोषणा केल्याचे पुरावे मागितले. पुढे सुप्रीम कोर्टाने वक्फच्या निर्णयावर स्थगिती आणली. त्यानंतर कोर्टाने चौकशीचे आदेश दिले.

वक्फ बोर्डाला २०१८ सालच्या मध्यात कागदपत्राशिवाय ताजमहलावर हक्क सांगता येणार नाही, ही बाब लक्षात आली. त्यानंतर बोर्डाने ताजमहलवरील दावा सोडला. मीडिया रिपोर्टनुसार, ताजमहलला संरक्षित इमारत घोषित केली. तेव्हापासून ताजमहल भारत सरकारची प्रॉपर्टी आहे. याआधी १८५८ साली मुघल बादशाह बहादूर शाह जफरची प्रॉपर्टीचा ताबा ब्रिटेनच्या राणीकडे गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT