Waqf Board Amendment Bill: 'यूटी म्हणजे यूझ अँण्ड थ्रो'; उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा आला समोर, एकनाथ शिंदेंची सडकून टीका

Eknath Shinde Slams On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा समोर आलाय. त्यांची युटी म्हणजे 'यूझ अँण्ड थ्रो' असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.वक्फ विधेयकावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आलेत.
Waqf Board Amendment Bill
Eknath Shinde Slams On Uddhav Thackeray Saam Tv
Published On

वक्फ सुधारित विधेयकावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आलेत. उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा आता समोर आलाय. युटी म्हणजे 'यूझ अँण्ड थ्रो' म्हणजेच वापरा आणि फेका, असा अर्थ झाल्याच म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला मारलाय. वक्फ विधेयकाच्या (Waqf Board Amendment Bill) मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली.

पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा 'एसंशी' असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय.

वक्फ सुधारित विधेयकाविरोधात ठाकरे गटाच्या खासदारांनी मतदान केलं होतं, त्यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ सुधारित विधयेकावरून भाजप आणि एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला होता. त्यावर एकनाथ शिंदेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे आपल्याला गद्दार-गद्दार म्हणून हिणवत असतील तर मी त्यांना त्यांची युटी म्हणजेच 'युझ अँण्ड थ्रो' असं म्हणू का? वापरा आणि फेकून द्या असं म्हणू का? कारण त्यांची तशीच निती आहे.

Waqf Board Amendment Bill
Maharashtra Politics: वक्फ विधेयकाला ठाकरेंचा विरोध; उद्धव सेना पुन्हा फुटणार, बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ

त्यामुळे मला बोलायला लावू नका, माझ्याकडे बोलण्यासाठी भरपूर आहे. मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या, असा इशारा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला मारताना दिलाय. कालचा दिवस उद्धव ठाकरेंसाठी दुर्दैवी होता.

वक्फ बोर्डाच्या विधेयकाला त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या गटात असलेले खासदार ज्यांच्या मनात अजूनही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत, त्यांना खाली मान टाकावी लागली. त्यांच्या गटातील खासदारांनी त्याबाबत खंत व्यक्त केली, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Waqf Board Amendment Bill
Vidarbha Politics: विधानसभेत गैरप्रकार? विदर्भातील भाजपच्या 2 नेत्यांची आमदारकी अडचणीत

गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसाल झालाय

उद्धव ठाकरे मला गद्दार म्हणून हिणवत होते. खोके-खोके टीका केली. पण महाराष्ट्रातील जनतेने त्यांनाच खोक्यात बंद केलं. ठाकरे गटाने १०० जागा लढवल्या पण त्यांना २० जागांवर विजय मिळाला. तर आम्ही ८० जागा लढवल्या आणि आम्हाला ६० जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यातील जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला विधानसभा निवडणुकीत केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com