ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ताजमहालला जगातील सात आश्चर्यापैंकी एक मानले जाते.
पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनवलेल्या या ताजमहालला पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे येतात.
शाहजहानने हा ताजमहाल मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता.
ताजमहाल बांधण्यासाठी १६ वर्षे लागली. १६३२ मध्ये सुरु झालेले बांधकाम १६४८ मध्ये पूर्ण झाले.
१९८३ मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइडमध्ये ताजमहालचा समावेश करण्यात आला होता.
पण तुम्हाला माहीत आहे का, ताजमहालची डिझाइन कोणी तयार केली होती. जाणून घ्या.
युनेस्को वर्ल्ड हेरिटेजनुसार, उस्ताद अहमद लाहौरी यांनी ताजमहालची डिझाइन तयार केली होती. त्यांचा जन्म १५८० मध्ये लाहौर येथे झाला होता.
ते मुघल साम्राज्याचे प्रमुख होते. त्यांनी ताजमहालची डिझाइन तयार केली होती. याशिवाय ते लाल किल्ल्याचे देखील प्रमुख आर्किटेक्ट होते.