Vande Bharat Sleeper Trains x
देश विदेश

राजधानी अन् वंदे भारतच्या तिकीट बुकिंगमध्ये ५०० रूपयांची बचत करायचीय? मग हा ऑपशन एकदा बघाच

Skip Meals and Save Up to ₹500 on IRCTC: प्रीमियम ट्रेनमध्ये जेवण सक्तीचे नाही, आयआरसीटीसीकडून स्पष्टीकरण. जेवण अनचेक केल्यास ३०० ते ५०० रूपयांची बचत होईल.

Bhagyashree Kamble

प्रीमियम गाड्यांच्या तिकिटांचे दर इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त असतात. प्रवासादरम्यान, या प्रीमियम गाडीतून सुलभ सर्व्हिस मिळते. जे इतर गाड्यांच्या तुलनेत सोयीस्कर ठरते. सध्या सोशल मीडियावर आरसीटीसी बुकिंग अॅपच्या जेवणाबाबत चर्चा सुरू आहे. काही प्रवाशांनी असा दावा केला की, तिकीट बुकिंग करताना अॅप प्रवाशांकडून जेवणासाठी जास्त पैसे आकारात आहे. अॅपमध्ये 'नो फूड'चा पर्याय नाही. हा पर्याय अॅपमध्ये असायला हवा, अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे.

प्रीमियम गाड्यांमध्ये जसे की, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेस, या गाड्यांमध्ये इच्छेनुसार जेवणाचा पर्याय निवडता किंवा रद्द करता येत नाही. जर, असा ऑपशन असल्यास आपले प्रवासामागे ३०० ते ५०० रूपयांची बचत होऊ शकते.

भारतीय रेल्वेने प्रीमियम गाड्यांमध्ये जेवण अनिवार्य केले आहे का? असा सवाल सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला जात आहे. मात्र, इंडियन एक्स्प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना, एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रीमियम गाड्यांमध्ये तिकीटे बुक करताना, 'नो फूड' हा पर्याय काढून टाकण्यात आलेला नाही. रेल्वे अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केलं की, 'नो फूड' हा पर्याय अजूनही त्याच पानावर उपलब्ध आहे. 'ऑप्ट आउट पर्याय देखील त्याच पानावर उपलब्ध आहे', असे अधिकाऱ्याने सांगितलं.

आयआरसीटीसीवर जेवणाशिवाय तिकीट कसे बुक करावे?

सर्वात आधी IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवर खाते तयार करा.

लॉगिन करा.

तारीख अन् क्लास निवडा.

उपलब्ध ट्रेनच्या यादीतून ट्रेन सिलेक्ट करा.

क्लासवर क्लिक करून बुक करा.

पॅसेंजर डिटेल्स भरा.

'नो फूड रिक्वायर्ड' या ऑपशनवर क्लिक करा.

पेमेंट करा अन् तिकिट बुक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill: सुकून भी गुलाबी होता है...; शहनाज गीलचा नवा गुलाबी लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: छठ पूजेसाठी उत्तर भारतीय नागरिकांची रामकुंडावर मोठी गर्दी

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Politics: कोकणात राणे विरुद्ध राणे राजकीय संघर्ष? VIDEO

Tuesday Horoscope: मंगळवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! गणपती बाप्पा करतील इच्छा पूर्ण, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT