Rising tensions in the Strait of Hormuz as Iran and the US engage in high-stakes ceasefire negotiations. Saam tv
देश विदेश

इराण-अमेरिका युद्ध निर्णायक वळणावर, 48 तासांत शांतता की महायुद्ध भडकणार?

Iran Us War Ceasefire 48 Hours: तब्बल 43 दिवसांनंतरही इराण-अमेरिका युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुढच्या 48 तासांत युद्धविराम होणार असल्याची चर्चा रंगलीये. दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात कशा वाटाघाटी सुरू आहेत ? युद्धबंदीचा नेमका प्लॅन काय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर आलंय. ट्रम्प यांच्या धमक्यांना पुरून उरलेलं इराण युद्धातून मागे हटण्यास तयार नाहीये. इराणनं होर्मुझ जलमार्ग रोखून धरल्यानं जगात अस्थिरता निर्माण झालीये. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा 48 तासांची डेडलाईन दिलीये. तर दुसरीकडे, 45 दिवसांच्या युद्धविरामासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात.

खरंतर, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कस्तान हे देश इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करताहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन राजदूत स्टीव विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्यात मेसेजद्वारे चर्चा होतेय. तंसच, अमेरिकेने दिलेले अनेक प्रस्ताव इराणनं अद्याप स्वीकारलेले नाहीत. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यात 'टू-स्टेप' करार घडवून आणण्यासाठी चर्चा सुरू आहे.

पहिला टप्पा -

45 दिवसांचा तात्पुरता युद्धविरामांतर्गत दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवण्यात येणार आहेत.

दुसरा टप्पा -

कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी 45 दिवसांच्या काळात होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे आणि इराणच्या युरेनियम समृद्धीकरणावर ठोस तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी केल्या जाणार आहेत. मात्र एकीकडे, युद्धविरामासाठी चर्चा सुरू होत असताना होर्मुझ जलमार्गासंदर्भातली इराणची कठोर भूमिका अजूनही कायम आहे.

रविवारी 5 एप्रिलला इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात अमेरिका-इस्रायलला इशारा दिलाय. पर्शियन आखातात यापुढे एक नवी सुरक्षा व्यवस्था तैनात असेल त्यामुळे यापुढे हा जलमार्ग पूर्वीसारखा राहणार नाही असं आयआरजीसीनं स्पष्ट केलंय.

या सगळ्यात दोन्ही देशांत युद्धबंदी व्हावी, यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटीत अट एकच आहे ती म्हणजे, इराणला होर्मुझ जलमार्ग खुला करावा लागेल. मात्र, इराण आता मागे हटणार नाही, असं रिव्होल्युशनरी गार्ड्सनं आधीच स्पष्ट केलंय. एकूणच काय, तर होर्मुझ जलमार्गामुळे इराण-अमेरिका युद्ध दीर्घकाळ चालणार का, याकडं जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चुलीवर भाकरी भाजत वंचित बहुजन विकास आघाडीचे आंदोलन

Pune News: न्यायासाठी लढताना काळाचा घाला; दिव्यांग तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

CEC Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांना जोरदार झटका

मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा डाव, जैशच्या दहशतवाद्याचं टॉय कनेक्शन

India’s Largest Railway Station: भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं माहितीये का?

SCROLL FOR NEXT