प्रातिनिधिक फोटो  Saam Tv
देश विदेश

Pentagon On Iran: इराणने भारताच्या सागरी सीमेजवळ जहाजावर केला ड्रोन हल्ला, अमेरिकेचा दावा

Drone Attack: अरबी समुद्रात गुजरातच्या पोरबंदर किनार्‍याजवळ शनिवारी एका जहाजावर हल्ला ड्रोन हल्ला झाला होता. हा ड्रोन हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने केला आहे.

Satish Kengar

Pentagon On Drone attack on Indian ship in Arabian sea near Gujarat:

अरबी समुद्रात गुजरातच्या पोरबंदर किनार्‍याजवळ शनिवारी एका जहाजावर हल्ला ड्रोन हल्ला झाला होता. हा ड्रोन हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने केला आहे.

पेंटागॉनने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास झाला. मात्र जपानच्या मालकीच्या रासायनिक जहाजात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती. जी लवकरच विझवण्यात आली. पेंटागॉनच्या प्रवक्त्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, इराणने ड्रोनने हा हल्ला केला आहे.

जहाजात 21 भारतीय क्रू सदस्य होते. सूत्रांनी सांगितले की, भारतीय नौदलाने तैनात केलेल्या P-8I सागरी पाळत ठेवणाऱ्या विमानाने एमव्ही केम प्लूटो हे जहाज पाहिले आणि त्यांच्या क्रूच्या सुरक्षेची खात्री केली. (Latest Marathi News)

भारतीय नौदलाने जहाजाच्या मदतीसाठी एक आगाऊ युद्धनौका पाठवली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलाने आपले जहाज ICGS विक्रम देखील या जहाजाकडे मदतीसाठी पाठवले होते.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धानंतर वाढत्या प्रादेशिक तणावामुळे शिपिंग मार्गांनाही नवा धोका निर्माण झाल्याचे या हल्ल्यातून दिसून येते, असं बोललं जात आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात भारताला अद्याप थेट फटका बसला नाही. मात्र गुजरातजवळील या ड्रोन हल्ल्यामुळे भारताची चिंता नक्कीच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT