Gold and silver prices  Saam Tv
देश विदेश

Iran War Impact: इराण-इस्राइल युद्धाचा परिणाम, शेअर मार्केट कोसळणार; सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

Gold And Silver Prices: इराण-इस्राइलमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेंकावर हल्ले सुरू आहेत. याचा परिणाम आता जगभरात पाहायला मिळत आहे. सोनं-चांदीच्या किंमती वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Priya More

Summary -

  • इराण-इस्राइल युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार

  • शेअर बाजारात १ ते २ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता

  • सोनं-चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होणार

इराण-इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इराणवर अमेरिका- इस्रायलने संयुक्तरित्या हल्ला केल्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. या युद्धाचा फटका आता संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. इराणमध्ये अनेक देशातील नागरिक अडकले आहेत. तर दुसरीकडे या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सोनं आणि चांदीचे दर देखील वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या युद्धामुळे जागतिक शेअर बाजार १ ते २ टक्क्यांनी आणि क्रिप्टोकरन्सी ३ ते १० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराण-इस्राइल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले केले जात आहेत तर इराणी सैन्यही प्रत्युत्तर देत आहे. या युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिका आणि भारतीय बाजारपेठांमध्ये २ टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. क्रिप्टोकरन्सीमध्येही लक्षणीय घट होऊ शकते असा अंदाज आहे. तर दुसरीकडे सोने आणि चांदीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

या सर्व परिस्थितीमध्ये सोनं-चांदीच्या किमती अल्पावधीत १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. भारतामध्ये १ तोळा सोन्याचे दर १ लाख ८५ हजारांपर्यंत जाऊ शकतात. तर भारतामध्ये चांदीचे दर ३ लाख २० हजारांपर्यंत जाऊ शकतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये १०० डॉलरपार जाऊ शकतात. सोनं आणि चांदीच्या दरवाढीला एक नवा ट्रिगर मिळाला आहे. याचा परिणाम बराच काळ देखील दिसू शकतो.

याचाच परिणाम म्हणून शेअर बाजारात लक्षणीय घसरण होऊ शकते. परदेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकन शेअर बाजारासह जागतिक शेअर बाजारात १ ते २ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. विकेंद्रित एक्सचेंज, नॅस्डॅकमध्ये आधीच १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारातही १ ते २ टक्क्यांची घसरण होऊ शकते. शुक्रवारी सेन्सेक्समध्येही १ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. सोमवारी सेन्सेक्स ८०,००० अंकांच्या खाली येऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT