LPG Gas cylinder saam tv
देश विदेश

LPG Cylinder: गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, eKYC चं टेन्शन मिटलं; पण...

LPG Gas Cylinder eKYC: गॅस सिलिंडरसाठी ईकेवायसी करण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ईकेवायसीचे टेन्शन मिटलं आहे. ईकेवायसी करणं कुणासाठी बंधनकारक आहे हे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले.

Priya More

Summary:

  • गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला

  • गॅस सिलिंडरसाठी ईकेवायसी करणं सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक नसणार

  • केंद्र सरकारने ईकेवायसीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतामध्ये होत आहे. या युद्धामुळे भारतामध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारतातील नागरिक सध्या चिंतेत आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे. अशातच आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने गॅस सिलिंडरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ईकेवायसीची झंझट संपली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, ज्या एलपीजी ग्राहकांनी आतापर्यंत ईकेवायसी केली नाही फक्त त्यांच्यासाठीच ईकेवायसी करणं आवश्यक आहे. हा नियम सर्व एलपीजी ग्राहकांसाठी लागू करण्यात आला नाही. सोशल मीडियावर यासंदर्भात व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सर्व एलपीजी ग्राहकांनी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. या व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे एलपीजी ग्राहकांमध्ये ईकेवायसीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ईकेवायसी करणे हा काय नवीन नियम नाही. या पोस्टचा उद्देश जास्तीत जास्त ग्राहकांनी आपली ईकेवायसी पूर्ण करणे हा आहे. मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, ईकेवायसी फक्त त्या ग्राहकांसाठी गरजेची आहे ज्यांनी आतापर्यंत ही प्रक्रिया पूरण केली नाही. ज्या ग्राहकांनी आधी ईकेवायसी केली आहे त्यांना पुन्हा ईकेवायसी करण्याची गरज नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांपूरती हे मर्यादित आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ही प्रक्रिया वर्षातून फक्त एकदा करावी लागते आणि ती पण ७ सिलिंडर घेतल्यानंतर म्हणजेच ८ व्या आणि ९ व्या रिफिलवर सब्सिडी मिळवण्यासाठी ईकेवायसी गरजेची आहे.

सरकारने पुढे असे देखील स्पष्टपणे सांगितले की, ही प्रक्रिया अतिशय सोपी असून त्यासाठी एलपीजी डीलरकडे जाण्याची आवश्यकता नाही. ई-केवायसी तुम्ही घरबसल्या विनामूल्य करू शकता. या प्रक्रियेमुळे एलपीजी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, सिलिंडरचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहील. आधार-आधारित ई-केवायसीमुळे एलपीजी प्रणालीमध्ये पारदर्शकता येते, अनुदान योग्य लोकांपर्यंत पोहोचते, फसवणूक करणारे ग्राहक यापासून दूर होतात आणि सिलेंडरचा गैरवापर रोखला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपने डाव टाकला, ममता बॅनर्जी चक्रव्यूहात अडकल्या? नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला

Owl Meaning: रात्री घुबड दिसणं शुभ की अशुभ? हे उत्तर वाचून बसेल धक्का

Pune Crime: पुण्यातील मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

मोठी बातमी! मुंबईच्या भाजप आमदाराला 'पीएमओ'चा दणका; थेट पीएम मोदींनीच दिले कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT