इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत असून कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तणावाच्या परिस्थितीत इराणमधून मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलच्या एका अरबपीचं जहाज इराणने जप्त केलं असून इराण सैन्याच्या कमांडोंनी या जहाजाचा ताबा घेतला आहे. या जहाजावर २५ क्रू मेंबर आहेत, त्यात १७ भारतीयांचा समावेश आहे. भारत सरकारने इराणच्या दूतावासाशी संपर्क केला असून जहाजावर अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इस्रायलच्या जहाजावर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये इराणी कमांडो हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कंटेनर जहाजाला वेढा घालत असल्याचं दिसत आहे. इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासावर बॉम्बहल्ला इराणने हे जहाज जप्त केलं आहे. या हल्ल्यात इराणचा एक कमांडर मारला गेला आहे. इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी एमएससी एरीज हे जहाज ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
आता इराणही इस्रायल-हमास युद्धात उडी घेण्याची शक्यता आहे. त्यार्श्वभूमीवर भारतानेही नागरिकांसाठी अलर्ट जारी केला असून इस्राइल-इराणचा प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. इराणी मीडियाने दावा केला आहे की या जहाजावर पोर्तुगीज ध्वज होता आणि जहाज इस्रायलचं असल्याचा संशय व्यक्त केला आहे. इराणी कमांडोंनी ताबा घेतल्यानंतर जहाज इराणच्या हद्दीत नेण्यात आलं आहे.
अमेरीकेनं माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींनी इस्रायलवर हल्ला चढविण्याची योजना आखलीय. मात्र त्यातील राजकीय जोखमीचा ते अंदाज घेतायेत. इराण 100 हून अधिक ड्रोन आणि डझनभर क्षेपणास्त्रांसह एकाच वेळी हल्ल्याची तयारी करतय. दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की अमेरिकन लष्कराचे अधिकारी इस्रायलपर्यंत पोहोचले आहेत. चीन आणि सौदीला फोन करून अमेरिका सलोख्यासाठी प्रयत्न करतय. एवढं करूनही इराणनं प्रत्युत्तर दिल्यास इस्रायलला एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.