Iran Cluster Bomb Attack on Israel Saam Tv News
देश विदेश

Cluster Bomb : इराणचा इस्त्रायलवर क्लस्टर बॉम्बचा हल्ला, क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख

Iran Cluster Bomb Attack on Israel : इस्त्रायल- इराण युद्धात जगाची होरपळ होतेय. अशातच इराणकडून इस्त्रायलविरोधात ९४ देशांनी बंदी घातलेल्या एका बॉम्बचा वापर करण्यात आलाय. हा बॉम्ब नेमका कोणता आहे? या बॉम्बचा वापर किती घातक आहे?

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

इस्त्रायल-इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. अशातच इराणनं इस्त्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय. या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्त्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं. विशेष म्हणजे, २००८ साली ९४ देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही, असं ठरवलं होतं. तरीही इराणने इस्त्रायलविरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय. क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे? या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला? पाहूयात.

विध्वंसक क्लस्टर बॉम्ब

क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख

दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी क्लस्टर बॉम्बचा वापर

व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर

200 ते 2,000 मीटर पर्यंत विध्वंस घडवून आणण्याची क्षमता

एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब

2008 साली 94 देशांकडून क्लस्टर बॉम्बच्या वापर न करण्यासंदर्भात करार

दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाइलनेही हल्ले सुरु आहेत. या मिसाइलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरु आहे. दुसरीकडे इराण- इस्त्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत. इस्त्रायलशी संबंधित हॅकर्सने इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून 781 कोटी रुपयांची चोरी केलीय. त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय. त्यामुळे हे युध्द आता क्षेपणास्त्रांपुरतच मर्यादीत राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युध्दापर्यंत गेली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT