
देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आंध्र प्रदेशातही संतापजनक घटना घडलीय. मुलीवर दोन वर्षे १४ जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक व्ही रत्ना यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, 'मुलीचं वय, सामाजिक स्थितीनं तिला असुरक्षित केलं. मुलीनं शाळा सोडली की नाही किंवा ती मानसिक धक्क्यात आहे, हे शिक्षक, आरोग्य सेवक, महिला सुरक्षा स्वयंसेविका यापैकी कुणीच बघितलं नाही.'
पीडित मुलगी ही १३ वर्षांची होती. आठवीत शिकत होती. एके दिवशी ती मैत्रिणीसोबत शाळेतून घरी जात होती. त्याचवेळी एका आरोपीनं तिचे फोटो काढले. त्यानंतर ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचेही त्यांनी व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ त्याने आपल्या साथीदारांनाही दिले. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले.
या प्रकरणात एकूण १७ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील १४ आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर अन्य तीन आरोपींना घटनेबद्दल माहीत असूनही त्यांनी याबाबत आवाज उठवला नाही. एकूण आरोपींपैकी तिघे हे अल्पवयीन आहेत. तर इतर आरोपी हे १८ ते ५१ वयोगटातील आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता पॉक्सो अॅक्ट आणि आयटी अॅक्टमधील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुलीच्या लग्नाचा घाट घातला, पण...
मुलीनं शिक्षण सुरू असताना अचानक शाळा सोडली. मात्र कोणत्याही शिक्षकानं याबद्दल माहिती दिली नाही. महिला संरक्षण कार्यकर्त्या आणि आशा वर्कर यांनीही तिच्या घरी जाऊन विचारणा केली नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना उघड झाल्यानंतर काही स्थानिक नेत्यांनी मुलीचं लग्न लावून देण्याचा घाट घातला.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. २१ जुलैनंतर तिची प्रसूती होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तिला रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. तिला परत गावात पाठवणं जोखमीचं आहे. आरोपी तुरुंगात असले तरी, त्यांच्यामार्फत तिच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. प्रसूतीनंतर मुलीसह नवजात बाळाला सरकारी महिला सुधारगृहात पाठवण्यात येईल. तिथे तिला संरक्षण, पुनर्वसन आणि तिचं समुपदेशन केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.