मोदींच्या भाषणानंतर लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण
सध्या कोणताही अधिकृत निर्णय नाही
कोविडसारखी तयारी ठेवण्याचा सरकारचा संदेश
'सध्याची परिस्थिती चिंताजनक असून भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि देशातील नागरिकांवर दूरगामी परिणाम होतील. कोविड-१९ महामारीच्या काळात भारत जसा सज्ज, सतर्क आणि एकजूट होता, त्याचप्रमाणे आताही असण्याची गरज आहे', पंतप्रधान मोदींच्या या विधानामुळे देशातील जनता चिंतेत पडली आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात कोविडचा उल्लेख केला होता. त्यांच्या भाषणानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात येणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.
सहा वर्षांपूर्वी कोरोना या महामारीमुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्याचा देशातील लोकांच्या जीवनात मोठा परिणाम झाला होता. इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे भारत आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर या चर्चा सुरू आहेत. लोक त्याबाबतची माहिती इंटरनेटवर शोधत आहेत. त्याचदरम्यान पश्चिम-आशियातील युद्धावरून चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय दलाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
सहा वर्षांपूर्वी २४ मार्च २०२० रोजी देशव्यापी लॉकडाऊनची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की, जर कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर भारत अनेक दशके मागे जाईल. त्यानंतर दीर्घकाळासाठी लॉकडाऊन लागू झाला. आता परत लोक लॉकडाऊनची चर्चा आहेत. त्याचे कारण आहे, पंतप्रधान मोदींचे भाषण.
अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरात तेलाचे संकट निर्माण झाले आहे. नुकतेच पंतप्रधान मोदींनी संसदेत पश्चिम आशियाई संकटावर एक निवेदन दिले. लोकसभेतील सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना, नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना महामारीच्या काळात जागतिक पुरवठा साखळ्या कशा विस्कळीत झाल्या होत्या याची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय निर्माण झाली आहे.
मोदींनी संसदेत पश्चिम आशियातील तणावाच्या संदर्भात सरकारची भूमिकाही सांगितली. ते म्हणाले, याआधीही आमच्या सरकारने जागतिक संकटांचे ओझे शेतकऱ्यांवर पडू दिले नाही. "कोरोनाच्या काळातही आपण अशा आव्हानांना एकजुटीने सामोरे गेलो आहोत." आता आपल्याला पुन्हा सज्ज होण्याची गरज आहे. आपण प्रत्येक आव्हानाला संयम, आत्मसंयम आणि शांत मनाने सामोरे गेले पाहिजे.
जर आपण विचारले की, अमेरिका-इराण युद्धामुळे भारतात लॉकडाउन होईल का, तर त्याचे उत्तर आहे 'नाही'. पंतप्रधान मोदी किंवा सरकारकडून तसे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. कोविड-१९ महामारीच्या काळात त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी जगभरातील देशांनी ही लॉकडाऊन लागू केली होती. परंतु इराण-अमेरिका युद्धादरम्यानची परिस्थितीत लॉकडाऊन करता येणार नाही. पण तेल संकट आणि एलपीजी संकट हाताळण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे, अशा काही उपाययोजना केल्या जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.