15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची संपूर्ण यादी
राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल
आयपीएस अधिकाऱ्यांना कुठे मिळाली नवीन पोस्टिंग
उत्तर प्रदेश सरकारनं पोलीस विभागात मोठा फेरबदल केला अशून राज्यातील १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केला आहेत. या फेरबदलात अनेक महत्त्वाची पदे नवीन अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहेत. लखनौचे पोलीस आयुक्त अमरेंद्र सिंह सेंगर यांची महासंचालक (गुप्तचर विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आल. तर तरुण गाबा यांची लखनौचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीनुसार पीयूष मौर्य यांची प्रयागराज पोलीस आयुक्तालयाचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नवीन अरोरा यांच्याकडे वाराणसी क्षेत्राचे (झोन) एडीजी (ADG) आणि राम कुमार यांच्याकडे गोरखपूर क्षेत्राचे एडीजी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय.
धर्मवीर यांची प्रयागराज येथे पोलीस महानिरीक्षक म्हणून पीएसी (पूर्व विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद कुमार सिंह यांची लखनौ येथे महानिरीक्षक विशेष तपास (Special Investigation) म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासह जोगेंद्र कुमार यांची मुरादाबाद येथे आयजी पीटीएस (PTS), अनूप कुमार सिंह यांची एसपी, ईओडब्ल्यू (EOW) आणि आनंद कुमार यांची एसपी, जन-तक्रार निवारण (मुख्यालयाशी संलग्न) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
अशोक जैन यांना अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे महानिरीक्षक नियुक्त करण्यात आले. सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस विभागात कार्यकुशलता अधिक चांगली करण्यासाठी बदली करण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.