Instagram Influencer Saam Tv
देश विदेश

Instagram Influencer : न्यूड फोटो पाठवायची अन् मग करायची ब्लॅकमेल; आलीशान कारमध्ये फिरणाऱ्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला अटक

Jasneet Kaur Arrested : अटकेनंतर जसनीतच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Shivani Tichkule

Jasneet Kaur News : इन्स्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अनेक लोक इन्फ्लुएन्सर बनतात. या इन्फ्लुएन्सर्सच्या फॉलोअर्सचा आकडा देखील खूप मोठा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या प्लॅटफॉर्मचा दुरूपयोगही केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहालीची इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर जसनीत कौरला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

जसनीत कौर आपले अश्लील फोटो तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सला पाठवून त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करायची. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. मोठमोठ्या बिझनेसमन्सला तिने आपल्या जाळ्यात फसवलं होतं. पोलिसांच्या (Police) अटकेनंतर जसनीतविषयी बरेच धक्कादायक खुलासे झाले आहेत. ब्लॅकमेलिंग आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली पोलिसांनी जसनीतला अटक केली. 

जसनीत कौरचे सोशल मीडियावर (Social Media) दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्‍लील कपड्यांमध्ये तिचे रील पोस्ट करत असे. फक्त इन्स्टाग्रामवरच नाही तर टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तिचे अकाऊंट आहेत.

पोलिसांनी सांगितले की जसनीत कौर तिच्या फॉलोअर्सशी चॅट करायची आणि नंतर तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ त्यांना पाठवायची. यानंतर पैसे लुटण्यासाठी ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला. जसनीत सोशल मीडियावर विशेषतः श्रीमंत पुरुषांना टार्गेट करायची आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायची.

काँग्रेस नेत्याचा सहभाग?

दरम्यान, या प्रकरणात युवक काँग्रेसच्या (Congress) एका नेत्याचेही नाव पुढे आले आहे. लकी संधू असे या काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून जसनीत कौर हिला ताब्यात घेण्यात आले. लकी संधू हा लोकप्रिय चेहरा असून युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदासाठी निवडणुकीची तयारी करत आहे. सध्या संधू हा फरार असून पोलीस त्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. १ एप्रिल रोजी जसनीत कौरविरुद्ध लुधियानाच्या मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT