Pune News : चांदणी चौकातील वाहतूक 10 एप्रिलपासून बंद राहणार, पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार

१५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
Pune News
Pune NewsSaam TV
Published On

Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. १५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. Latest News

गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्विस रोडचे काम आता पूर्ण झाले आहे.

Pune News
Mumbai Crime News : एटीएम मशीन सोबत छेडछाड करून कॅश चोरी; दोन जणांना अटक

१० एप्रिलला चांदणी चौकातील सर्विस रोड सुरू होतोय. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात येईल.

हे असतील पर्यायी मार्ग

मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून,१० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे 'एनएचएआय'कडून सांगण्यात आलय. चांदणी चौकातील कामाला आता वेग आला असून १ मे रोजी मुख्य पुलाचे उद्घाटन होणार आहे.

Pune News
Politics Breaking : 'फडतूस'वरून राजकीय वर्तुळात राजकारण तापलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com