Instagram Reels Saam Tv
देश विदेश

Instagram Service Resumed: डाऊन झालेली Instagram ची सेवा पुन्हा सुरु, नेमकं काय झालं होतं?

Priya More

Instagram News: मेटाचे (Meta) फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामची (Instagram) सेवा काही वेळासाठी डाऊन झाली होती. जगभरातील अनेक वापरकर्त्यांनी याबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. भारतात देखील बऱ्याच इन्स्टाग्राम युजर्सला वापर करताना अडचणींचा सामना करावा लागला. भारतातील 150 हून अधिक वापरकर्त्यांनी अॅपसह समस्या नोंदवल्या आहेत. वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर आता इन्स्टाग्रामची सेवा पुन्हा सुरु झाली आहे.

इन्स्टाग्रामच्या Android आणि iOS अॅप्सवर पोस्ट लोड होत नसल्याबद्दल वापरकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. अनेक वापरकर्त्यांनी या तक्रारी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केल्या होत्या. 100 हून अधिक वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर देखील तक्रार नोंदवली आहे. जगभरातील अनेक वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामचा वापर करताना ही समस्या येत होती. पण काही तासांनंतर इन्स्टाग्रामची डाऊन झालेली सेवा पुन्हा सुरु झाली आहे. इन्स्टाग्रामसोबतच गुरुवारी मॅसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स्अॅपची सेवा देखील काही वेळासाठी डाऊन झाली होती.

मीडियावर चालणाऱ्या बातम्यांनुसार, इन्स्टाग्रामची सेवा बुधवारी रात्रीपासूनच डाऊन होती. जवळपास ६०० पेक्षा अधिक युजर्संनी इन्स्टाग्रामवर व्हडिओ आणि शेअरिंगची समस्या येत असल्याची तक्रार केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आऊटेलला रिपोर्ट करणाऱ्या प्लॅटफॉर्म डाऊनडिक्टेटरच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ८० टक्के वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामचा वापर करताना अडचणी येत होत्या. पण हे आउटेज कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसंच, इन्स्टाग्रामने देखील आपल्या प्लॅटफॉर्मनवर या आऊटेजची बाब कबूल केली नाही. यासोबतच कंपनीकडून याबाबत काहीच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

जगभरातील वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम डाऊन झाल्याच्या समस्येचा सामना करावा लागला. काही वापरकर्ते थोड्या काळासाठी इन्स्टाग्रामवर एक्सेस करू शकत नव्हते. तर काही युजर्सच्या म्हणण्यानुसार इन्स्टाग्राम चांगले काम करत होते. इन्स्टासोबतच मेटाच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने देखील त्याच्या सेवेत व्यत्यय पाहिला. वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यात आणि येण्यास अडथळा येत होता. पण काही वेळातच ही सेवा पूर्ववत झाली.

गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामसह मेटाच्या मालकीचे सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तासांसाठी बंद होते. इन्स्टाग्राम डाऊन होण्याची ही या वर्षातली तिसरी वेळ आहे. मे महिन्यामध्ये यूएसमधील अनेक वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याबद्दल तक्रार नोंदवली होती. मार्चमध्ये अशीच परिस्थिती पाहण्यात आली होती. जवळपास 27,000 वापरकर्त्यांना समस्येचा सामना करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT