Delhi Shocking News Saam tv
देश विदेश

Shocking News : आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर दिला विजेचा शॉक; बायकोने नवऱ्याला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Delhi News : दिल्लीतील करण देव याची पत्नी आणि भावाने मिळून त्याची हत्या केली. या हत्येचा कट इंस्टाग्राम चॅटवरून उघड झाला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Alisha Khedekar

दिल्लीतील द्वारका येथे झालेल्या करण देव यांच्या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. हे एक नियोजित हत्याकांड असल्याचं म्हटलं जात आहे. करण देव याची पत्नी आणि भाऊ यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमात अडथळा होणाऱ्या करण देवचा काटा काढण्यासाठी इंस्टाग्रामवर कट रचल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी करणची पत्नी आणि भावाला ताब्यात घेतले आहे.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशापद्धतीने पत्नीने पतीला ठार मारण्याचा कट रचला. विशेष म्हणजे करण देवची पत्नी सुष्मिता आणि त्याचा भाऊ राहुल या दोघांनी मिळून इंस्टाग्रामवर संपूर्ण स्क्रिप्ट रचली. यामध्ये पत्नीने दिरासोबत मिळून पतीचा काटा काढला. हत्येपूर्वी समोर आलेले इंस्टाग्रामवरील संभाषण कोणत्याही थ्रिलरपेक्षा कमी नाही. हत्येनंतर पत्नीने आपल्या सासरच्या मंडळींना फोन करून करणचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, करणचा धाकटा भाऊ कुणालला संशय आला. त्याने तिचे चॅट वाचले आणि पोलिसांना पुरावे दिले. हे चॅट करणच्या चुलत भावाच्या मोबाईलमध्ये सापडले होते.

करण देवची हत्या कशी करण्यात आली ?

करण देवच्या हत्येचा कट इंस्टाग्रामवर रचण्यात आला होता. आरोपी पत्नीने दिराच्या सांगण्यावरून पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर आरोपी पत्नीने झोपेच्या गोळ्या देऊनही पतीचा जीव दगावला नसल्याची खबर दिराला दिली. दिराने आरोपी महिलेला विजेचा शॉक देण्याचे सांगितले. दिराच्या सांगण्यावरून करणची पत्नी तयार झाली मात्र ती हे एकट्याने करू शकत नसल्याने तिने करणच्या भावाला देखील बोलावून घेतले. आणि दोघांनी मिळून झोपेत असलेल्या करणला विजेचा शॉक दिला. या शॉकमुळे करणचा वेदनादायी मृत्यू झाला.

इंस्टाग्राम चॅट्समध्ये काय होत ?

करण देवच्या हत्येमागील त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर या दोघांचे इंस्टाग्रामवरील चॅट्स समोर आले आहेत. या चॅट्समध्ये करणची पत्नी सुष्मिता हिने करणच्या चुलत भावाला मेसेज केला होता की, "मी देवला जेवणातून १५ झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत तरीही त्याचा श्वास सुरु आहे. औषध घेतल्यानंतर मृत्यू होण्यास किती वेळ लागतो ते एकदा तपासा. त्याला जेवण करून तीन तास झाले आहेत. उलट्या झाल्या नाहीत. आणि अजून मृत्यूही झालेला नाही." यावर करणचा भाऊ राहुल याने उत्तर दिले आहे की," त्याला खुर्चीला बांधून विजेचा शॉक द्या" यावर सुष्मिताने म्हटले की," मला एकटीला हे जमणार नाही त्यामुळे तुम्हीही इथे या. "

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणच्या पत्नीचे आणि भावाचे प्रेमसंबंध असल्याचे इंस्टाग्राम मेसेजवरून उघडकीस आले आहे. इंस्टाग्राम मेसेजमुळे करणच्या मृत्यू मागील गूढ उलगडले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी करणच्या पत्नीला आणि भावाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे एकत्र येण्यावरून 'राजकीय काला'! ठाकरेंच्या नेत्यानं मनोरे रचले; शिंदे- फडणवीसांच्या नेत्यांनी फोडली राजकीय हंडी

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

SCROLL FOR NEXT