Inspiring Story Saam TV
देश विदेश

Inspiring Story: MBA चा कोर्स अर्ध्यात सोडला अन् मशरूम विकू लागला; आज महिन्याला कमवतोय १३ लाख

Mashroom Selar:राजस्थानमधून शंकरने या मशरुमचे उत्पादन सुरु केल्याने त्याला मागणीही वाढलीये. फक्त भारतातच नाही तर परदेशातूनही शंकरच्या मशरूमला मोठ्या प्रमाणात मागणीये. या मशरूममधून शंकरला महिन्याला 13 लाख रुपये मिळतात.

Ruchika Jadhav

तुषार ओव्हाळ

MBA Student:

सध्याच्या काळात सर्वच तरुणाई बेरोजगारीशी झुंज देत आहे. उच्च शिक्षण घेऊनही हाताला काम नसल्याने अनेक तरुणांना पैशांची चणचण भासतेय. मात्र यशाचा शिखर गाठण्यासाठी फक्त नोकरी हा एकच पर्याय नसून छोट्या व्यवसायातूनही लाखोंची कमाई करता येते हे सिद्ध करून दाखवलं आहे.

राजस्थानच्या शंकर मीणाने MBA चा कोर्स अर्धवट सोडून दिला. तेव्हा अनेक लोकांनी त्याच्या बुद्धीवर शंका घेतली. पण शंकरच्या मनात वेगळंच काही तरी होतं. तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर असं त्याला नातेवाईक सांगायचे.

पण शंकरला त्यातही रस नव्हता. त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने बाजारातील सर्व बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की, बाजारात मशरूमची मागणी आहे. पण हवा तसा पुरवठा होत नाही.

त्यामुळे शंकरने याचाच व्यवसाय करायचा असं ठरवलं. शंकरने आधी घरच्या घरी मशरुम पिकवायला सुरुवात केली. शंकरला केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून ९ लाख रुपयांच कर्जही मिळालं. शंकर आपल्या लॅबोरेटरीमधून बटन, ऑयस्टर, लायन्स मेन, पॅडी स्ट्रॉ, शीटेक, पोर्टबेल्लो सारख्या अनेक मशरुम पिकवतोय.

हे मशरुम फक्त हिमाच प्रदेश, हरयाणा आणि दिल्लीमध्ये पिकतात. आता राजस्थानमधून शंकरने या मशरुमचे उत्पादन सुरु केल्याने त्याला मागणीही वाढलीये. फक्त भारतातच नाही तर परदेशातूनही शंकरच्या मशरूमला मोठ्या प्रमाणात मागणीये. या मशरूममधून शंकरला महिन्याला 13 लाख रुपये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT