INS Imphal Saam Tv
देश विदेश

INS Imphal: समुद्रात वाढली भारताची ताकद! युद्धनौका 'इंफाळ' नौदलाच्या ताफ्यात सामील

Indian Navy News: समुद्रात वाढली भारताची ताकद! युद्धनौका 'इंफाळ' नौदलाच्या ताफ्यात सामील

Satish Kengar

Indian Navy News:

समुद्रात भारताच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. 'इंफाळ' म्हणजे यार्ड 12706 हे प्रोजेक्ट 15बी वर्गातील गाईडेड मिसाईल प्रणालीयुक्त तिसरी विनाशिका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) आज भारतीय नौदलाला सुपूर्द केली.

या जहाजाची बांधणी DMR 249A हे स्वदेशी पोलाद वापरून केली आहे आणि भारतात बांधलेल्या सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक आहे. जहाजाची एकूण लांबी 164 मीटर आहे आणि तर वजन 7500 टन पेक्षा जास्त आहे. सागरी युद्ध क्षमतेचा विचार करता तसेच युद्धामधील विविध मोहिमा आणि डावपेच बघता हे जहाज लक्षणीयरीत्या सक्षम असे व्यासपीठ आहे. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘बराक-8’ या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समुद्राखालील युद्ध क्षमतेचा विचार करता यात स्वदेशी पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्स बसवलेले आहेत. विशेषत्वाने विनाशिकेच्या नांगरावर सोनार हम्सा एनजी, अवजड टॉर्पेडो ट्यूब लाँचर्स आणि एएसडब्लू रॉकेट लाँचर्स बसवले आहेत.

नौदलातील आधीच्या विनाशिका आणि युद्धनौकांच्या क्षमतांपेक्षा ही लक्षणीयरीत्या अधिक अष्टपैलू आहे. शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांविरुद्ध इंफाळची सर्वांगीण क्षमता ही जहाजांच्या मदती शिवाय स्वतंत्रपणे कार्य करण्यास आणि नौदल कृती दलाचे प्रमुख म्हणून कार्य करण्यास ती सक्षम ठरेल.  (Latest Marathi News)

'इंफाळ'ही आजपर्यंतची सर्वात अधिक लढाऊ क्षमतेची विनाशिका असून ती करारातील वेळेच्या चार महिने आधीच भारतीय नौदलाला देण्यात आली आहे. हे एम डी एल च्या कार्यातील सातत्यपूर्ण सुधारणा आणि जागतिक मानदंडांच्या तोडीस तोड कार्य करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या जहाजाने 03 सीएसटी (कॉन्ट्रॅक्टर्स सी ट्रायल) मध्ये पहिल्याच सीएसटीमध्ये प्रमुख शस्त्रास्त्रांच्या फैरींसह सर्व सागरी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

हे जहाज सर्व P15B जहाजांपैकी पहिले जहाज आहे ज्यामधील अधिक सुधारित अशा ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमध्ये लांब पल्ल्याची आणि जमिनीवर हल्ला करण्याची दुहेरी भूमिका निभावण्याची क्षमता आहे. तसेच इंफाळ ही पहिली नौदल युद्धनौका आहे ज्यामध्ये महिला अधिकारी आणि खलाशांच्या निवासाची सोय आहे.

ही विनाशिका एकूण 312 कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकते, त्याची क्षमता 4000 नॉटिकल मैल आहे आणि ती नियोजित मोहिमेपेक्षा विस्तारित मोहिम वेळेसह ठराविक 42 दिवसांची मोहीम पार पाडू शकते. विनाशिकेची पोहोच आणखी वाढवण्यासाठी त्यावर दोन हेलिकॉप्टर आहेत. जहाज एका शक्तिशाली कम्बाइंड गॅस अँड गॅस प्रोपल्शन प्लांट (COGAG) द्वारे चालवले जाते, ज्यामध्ये चार उलट करता येण्याजोग्या गॅस टर्बाइनचा समावेश आहे, ज्यामुळे तिला 30 नॉटिकल मैल (अंदाजे 55 किमी प्रतितास) पेक्षा जास्त वेग गाठता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT