Gujrat Inner Wear Theif News Saam TV
देश विदेश

Gujrat Inner Wear Theif News: दोरीवर वाळत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरीला जायची, महिलेने शेजाऱ्यावर संशय घेताच झाली कुटाकुटी

साम टिव्ही ब्युरो

Ahmedabad News: आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या असतील. पैसा आणि संपत्ती कमवण्यासाठी नागरिक कोणत्याही थराला जात चोरी करतात. मात्र तुम्ही कधी महिलांचे अंतर्वस्त्रे चोरल्याचं कधी ऐकलं आहे का? एका गावात अशी घटना घडली आहे. या घटनेतील चोराचाही शोध लागलाय. तसेच सर्वांनी मिळून या चोराला बेदम चोप दिला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाहबादमधील एका गावात ही घटना घडली आहे. या गावात गेल्या ८ महिन्यांपासून एका महिलेची अंतर्वस्त्रे चोरी होत होती. अंतर्वस्त्रे धुवून बाहेर वाळत घातल्यावर एक व्यक्ती ते चोरत असे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. यामुळे महिला पूर्णत: वैतागली होती.

चोर काढला शोधून

महिलेने आपली अंतर्वस्त्रे चोरी होत असल्याने एक दिवस चोरट्याचा शोध घेण्याचं ठरवलं. तिने थेट आपल्या फोनमधील कॅमेरा ऑन केला आणि अंतर्वस्त्रे सुकवत असलेल्या ठिकाणी ठेवला. नेहमी प्रमाणे चोर तेथे आला आणि त्याने अंतर्वस्त्रे चोरली आणि तो महिलेच्या कॅमेऱ्यात कैद झाला. महिलेला चोर नेमकं कोण आहे हे समजलं.

चोर आणि महिलेत झटापट

दुसऱ्या दिवशी पुन्हा आपले अंतर्वस्त्रे महिलेने नेहमीच्या ठिकाणी वाळण्यासाठी ठेवले. यावेळी ती तेथेच शेजारी उभी राहिली. नेहमीप्रमाणे चोर आला आणि त्याने दिवसाढवळ्या महिलेचे अंतर्वस्त्रे चोरले. त्यानंतर महिला चोर ही अंतर्वस्त्रे घेऊन नेमकं काय करतोय याचा शोध लावण्यासाठी त्याचा पाठलाग केला. तितक्यात चोराला समजले की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.

शेजारीच निघाला चोर

सदर घटनेत शेजारी व्यक्तीच चोर असल्याचं समजलं आहे. महिला आपला पाठलाग करत असल्याचं समजताच तो तिच्यावर हल्ला करतो. महिला आणि चोर या दोघांमध्ये झटापट होऊन महिला आपल्या बचावासाठी जोरजोरात ओरडू लागते. तिचा आवाज ऐकताच कुटुंबातील इतर व्यक्ती घटनास्थळी धाव घेतात. त्यानंतर महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती या चोराला बेदम मारहाण करतात. सदर घटनेत चोरीचा संशय असलेल्या व्यक्तीचे कुटुंबीय देखील बाहेर येतात आणि महिलेच्या घरच्यांसह हाणामारी करु लागतात.

१० जण जखमी

या दोन्ही गटांत पुढे जोरदार हाणामारी होते. या हाणामारीत दोन्हींच्या कुटुंबातील १० जण जखमी झाले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनी एकून २० व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. तसेच या हाणामारीत १० जण जखमी झालेत. त्यामुळे जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT