Jammu Kashmir Infiltration, Security Forces Search Operation, ib akhnoor sector SAAM TV
देश विदेश

Jammu Kashmir Infiltration : भारतीय जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव; साथीदाराचा मृतदेह सीमापार फरफटत नेत दहशतवादी पळत सुटले

Jammu Kashmir Infiltration bid Foiled : पाकिस्तानकडून आलेल्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराच्या जवानांनी हा नापाक डाव उधळून लावला.

Nandkumar Joshi

Jammu - Kashmir News :

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. जिगरबाज भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला. अखनूर सेक्टरमध्ये चार दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षादलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याचा मृतदेह सीमापार फरफटत नेत इतर तीन साथीदार दहशतवाद्यांनी पळ काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय लष्कराच्या (Indian Army) 'व्हाइट नाइट कोर'ने एक्स अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली. खौर, अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. २२ आणि २३ डिसेंबरच्या मध्यरात्री सीमेवर चार दहशतवाद्यांच्या (Terrorist) संशयास्पद हालचाली पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून टिपण्यात आल्या.

त्यानंतर भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात एका दहशतवादी मारला गेला. त्याचा मृतदेह इतर साथीदार दहशतवाद्यांनी सीमापार फरफटत नेल्याचे दिसून आले, अशी माहिती देण्यात आली.

पूंछमध्ये तिघांचे मृतदेह आढळले

जम्मूच्या (Jammu-Kashmir) पूंछमध्ये चकमकीच्या ठिकाणी तीन जणांचे संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले. पूंछचे उपायुक्त चौधरी मुहम्मद यासिन आणि एसएसपी विनय कुमार यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.

जम्मू विभागाचे आयुक्त रमेश कुमार यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दुसरीकडे खबरदारी म्हणून राजौरी आणि पूंछमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

राजौरी-पूंछमध्ये गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात तीन ते चार दहशतवादी सामील होते. हा हल्ला डेरा की गली आणि बुफलियाज दरम्यान धत्यार येथे झाला होता.

या हल्ल्याआधी घटनास्थळाची रेकी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवादी आधी डोंगरावर गेले आणि तिथून लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली, मात्र दहशतवादी त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT