Terrorist Pannun Threat: खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली खासदार हेमंत पाटील यांना धमकी, 26 जानेवारीला स्फोट घडवून आणण्याची दर्पोक्ती

Terrorist Pannun Threat News: हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंह पन्नूने धमकी दिल्यामुळे खळबळ माजली आहे. हेमंत पाटील यांना दोनवेळा आंतरराष्ट्रीय नंबर वरून धमकीचा फोन आला आहे.
Terrorist Pannun Threat
Terrorist Pannun ThreatSaam Digital

Terrorist Pannun Threat

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी दहशतवादी गुरदीप सिंह पन्नूने धमकी दिल्यामुळे खळबळ माजली आहे. हेमंत पाटील यांना दोनवेळा आंतरराष्ट्रीय नंबर वरून धमकीचा फोन आला आहे. 14 डिसेंबर ला रात्री 10 वाजता त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. 26 जानेवारीला भारतात मोठा विस्फोट घडवून आणणार असून तुम्ही स्वतःला वाचवायचं असेल तर वाचवा, असं त्यांने म्हटलं आहे. हेमंत पाटील यांनी यासंदर्भात पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली आहे.

14 डिसेंबर ला मला पाहिला फोन आला होता. तो इंग्रजीत बोलत होता. त्याने २६ जानेवारीला देशात स्फोट घडवणार असल्याची धमकी दिली. लगेच मी 15 तारखेला मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना गोष्ट सांगितली. पुन्हा 20 तारखेला फोन आला तो मी उचलला नाही. त्यामुळं मी लगेच दिल्लीत वरिष्ठांना पत्र लिहिलं. त्यांच्या कार्यालयाला मी माझं पत्र दिलं आहेमला आधीच सुरक्षा असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Terrorist Pannun Threat
Poonch Terror Attack: पूंछ दहशतवादी हल्ल्यात मोठी कारवाई; ४ स्थानिक ताब्यात, चौकशी सुरू

गुरवंत सिंह पन्नू हा खलिस्तानी समर्थक असून अमेरिकन आणि कॅनडाचा नागरिक आहे. भारत सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषीत केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भारत सरकारला आणि नेत्यांना धमकी देण्याचं सत्र त्यांच्याकडून सुरू आहे. अलिकडेच अमेरिकेने भारताच्या एका नागरिकावर त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता.

Terrorist Pannun Threat
Corona JN.1 Variant Update: JN.1 व्हेरियंटवर लवकरच लस? 'सीरम' पुन्हा आले धावून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com