Stray Dogs AI Photo
देश विदेश

Crime News: धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं बाळ, भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे तोडले लचके

Dead baby found outside district hospital: जिल्हा महिला रुग्णालयाच्या बाहेरील कचऱ्याच्या ढिगार्‍यात एका अर्भकाचा मृतदेह आढळला आहे. काही भटक्या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले आहेत.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. जिल्हा महिला रुग्णालयाच्या बाहेरील कचऱ्याच्या ढिगार्‍यात एका अर्भकाचा मृतदेह आढळला आहे. बाळाचे मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्यानं, मृतदेहाचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मीनाक्षी देवी यांनी पीटीआयला सांगितले की, मडवारा ब्लॉकमधील बहादुरपूर गावातील रहिवासी संगीता यांना ९ फेब्रुवारी रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दिवशी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान, संगीताने एका बाळाला जन्म दिला.

मेंदूचा विकास कमी झाल्यामुळे बाळाला विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) हलवण्यात आले होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता बाळाचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधीक्षक मीनाक्षी पुढे म्हणाल्या की, यानंतर रुग्णालयाने मुलाचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवला.

मंगळवारी रुग्णालय प्रशासनाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका बाळाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. मृतदेहावरील ओळखपत्रावरून ते संगीताचे मूल असल्याचे निश्चित झाले. वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

संगीताचे पती अखिलेश यांनी दावा केला की, 'रुग्णालयातील एका परिचारिकेने बाळाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एका व्यक्तीला बाळाचे मृतदेह दिले होते. २०० रुपयांना परिचारिकेने मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, बाळाचे अंत्यसंस्कार करण्यात आले नसून, बहुतेक मृतदेह फेकून देण्यात आले असावे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT