Madhya Pradesh Accident  Saam Tv
देश विदेश

Accident: भयंकर अपघात! घाटात ओव्हरटेकचा प्रयत्न, ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये भयंकर बस अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये ३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये प्रवासी बसला भयंकर अपघात

  • भेरू घाटामध्ये बस दरीत कोसळली

  • ही बस ओंकारेश्वरवरून उज्जैनकडे जात होती

  • अपघातामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू तर ३८ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी

मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. सिमरोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत भयंकर रस्ते अपघात झाला. भरधाव बस खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये ३८ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वरवरून उज्जैनच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसला अपघात झाला. रात्री पावणे दहाच्या सुमारास इंदूरमार्गे ही बस जात होती. त्याचेवळी भेरू घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये ५० प्रवासी होते. या अपघातामध्ये तिघांनी जागीच प्राण सोडले तर ३८ पेक्षा अधिक जण जखमी झाले. हा अपघात झाला त्यावेळी जोरदार किंचाळ्यांचा आवाज झाला. बस दरीत कोसळताना बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले.

घटनेची माहिती मिळताच सिमरोल पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तात्काळ बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी हलवले. जखमींवर इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, भेरू घाटात वळणावर बस चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली.

पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ओंकारेश्वरवरून परतणारे प्रवासी होते. काही प्रवासी दिल्ली तर काही इतर शहरांमधून होते. या अपघातामध्ये पद्माबाई (४५ वर्षे, राहणार - इंदूर), राहुल( २५ वर्षे, राहणार - उत्तर प्रदेश) आणि अनिता (४० वर्षे, राहणार- इंदूर) या तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिस आणि प्रशासनाने खिडकीच्या काचा तोडून बसमधून प्रवाशांना बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

SCROLL FOR NEXT