Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Ghaziabad Crime News: शनिवारी उशिरा गाझियाबादच्या सिहानी गेट परिसरातील जुन्या बस स्टँडजवळ धक्कादायक घटना घडली. बहिणीच्या प्रेमसंबंधावरून तरुणाला आरोपीने चाकूने वार करून ठार मारले.
YOUTH STABBED TO DEATH BY SISTER’S LOVER NEAR POLICE STATION
YOUTH STABBED TO DEATH BY SISTER’S LOVER NEAR POLICE STATION
Published On

गाझियाबादमध्ये शनिवारी संध्याकाळच्या वेळी सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. एका तरुणाची त्याच्या बॉयफ्रेंडने बहिणीच्या भावाची चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जुन्या बस स्टँड चौकीसमोरील गजबजलेल्या मार्केटमध्ये घडली.

या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला घटनास्थळीच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

YOUTH STABBED TO DEATH BY SISTER’S LOVER NEAR POLICE STATION
Crime News: बायकोसोबत अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

कार्यवाहक एसीपी नंदग्राम प्रियश्री पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव पीयूष उर्फ नितीन असून तो कमल सिंग यांचा मुलगा आहे. शहर कोतवाली परिसरातील रहिवासी सुनील यादव या आरोपीचे पीयूषच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता.

YOUTH STABBED TO DEATH BY SISTER’S LOVER NEAR POLICE STATION
Shocking: मित्रानेच काढला मित्राचा काटा, पार्टीसाठी घराबाहेर बोलवलं अन् चाकूने सपासप केले ९० वार

शनिवारी संध्याकाळी जुने बस स्टँड पोलिस चौकीसमोर त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला आणि त्याच वेळी सुनील यादवने चाकूने पीयूषवर वार केले. पीयूष गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडलेला होता. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एसीपीने सांगितले की मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे.

YOUTH STABBED TO DEATH BY SISTER’S LOVER NEAR POLICE STATION
Shocking: नात्याला काळिमा! भावाने केला बहिणीवर बलात्कार अन् टेरेसवरून दिले फेकून, ८ वर्षांपासून करत होता अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com