Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Jaipur Accident: राजस्थानच्या जयपूरमध्ये भयंकर अपघात झाला. भरधाव डंपरने महामार्गावर १० वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. यामधील ८ जणांची प्रकृती गंभीर झाले.
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Jaipur AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • जयपूरच्या लोहा मंडी रोडवर भीषण अपघात

  • भरधाव डंपरने १० वाहनांना धडक

  • अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू

  • १५ जण जखमी असून ८ जणांची प्रकृती गंभीर

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. लोहा मंडी रोड क्रमांक १४ वर भरधाव डंपरने १० वाहनांना जोरदार धडक दिली. सोमवारी दुपारी अपघाताची ही घटना घडली. अनियंत्रित झालेल्या डंपरने ३०० मीटरपर्यंत १० वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. १५ जण जखमी झाले असून यामधील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. महामार्गावर जाणाऱ्या डंपरचा अचानक ब्रेक फेल झाला. डंपर अनियंत्रित होत त्याने महामार्गावरील अनेक वाहनं आणि पादचाऱ्यांना चिरडलं. हा डंपर ३०० मीटरपर्यंत वेगाने धावत होता. १० वाहनांना धडक दिल्यानंतर या डंपरने दुभाजकावर धडकला आणि नंतर थांबला. अपघातावेळी महामार्गावर सगळीकडे किंचाळ्यांचा आवाज, आरडोआरोडा ऐकू येत होता.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ आणि भीतीचे वातावरण होते. मृत आणि जखमी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिक नागिरकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले. जखमींना जवळच्या कानवटिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले. मृतांचे मृतदेह कानवटिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी, बचाव पथकाने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. डंपरने इतक्या जोरदार धडक मारली होती की अनेक वाहनं एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. अनेक वाहनांच्या आतमध्या काही जण अडकले होते. त्यांना कटर मशीन वापरून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून या अपघाताचा तपास ते करत आहेत.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
Amravati Accident : घरी जाताना काळाचा घाला, कारने दुचाकीला उडवले, २ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com