इंदूर : राजा आणि सोनम रघुवंशी प्रकरणातील सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत आहे. याचदरम्यान राजाचा मृतदेह सापडला. मात्र, सोनमचा अजूनही कोणताही पत्ता लागलेला नाही. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे की, त्यांचा मुलगा गोविंदला शिलाँगमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. स्थानिक प्रशासन सहकार्य करत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षेसाठी येथून लोक पाठवले आहेत. तसेच राजा आणि सोनमचा तिथल्या कॅफे ऑपरेटरशी वाद झाल्याचाही कुटुंबाला संशय आहे.
राजा रघुवंशीची स्कूटी सोहरीममध्ये सापडली होती. जवळच एक कॅफे होता. कॅफेजवळ ही स्कूटी सापडली होती. यानंतर २ जून रोजी वेइसावडोंगमधील धबधब्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह आढळला. तिथे जाताना राजा आणि सोनमचं आईशी बोलणं झालं होतं. सोनम आणि राजाचं येथील कॅफे ऑपरेटरशी भांडण झालं असावं असा कुटुंबाचा संशय आहे. या घटनेपासून कॅफे मालकही बेपत्ता आहे. मात्र पोलिसांनी कुटुंबीयांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. इंदूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा आणि सोनम दोघेही काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत एक पांढऱ्या रंगाची सूटकेस देखील आहे. राजा होमस्टेच्या रिसेप्शन डेस्कवर जाऊन कर्मचाऱ्यांशी बोलतो, तर सोनम तिचे जॅकेट काढून केस नीट करताना दिसते.काही वेळानंतर, राजा बाहेर येतो आणि सूटकेसमधून काही वस्तू काढून सोनमला देतो. सोनमने सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे, तोच शर्ट राजाच्या मृतदेहाजवळ सापडला होता. हे सीसीटीव्ही फुटेज २२ मे रोजीचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.