Shirur Crime : पुण्यात ३ अर्धवट मृतदेह जळालेले, Mom-Dad टॅटूवरुन क्लू सापडला, २७ पोलिसांचं पथक, २५० CCTV तपासून आरोपीला धरला

Shirur Three Bodies Burnt : विशेष बाब म्हणजे, पुणे ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या हातावर असलेल्या जय भीम राजरत्न, मॉम, डॅड आणि आर.एस या टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला.
Shirur burnt bodies of three people
Shirur burnt bodies of three peopleSaam Tv News
Published On

सचिन जाधव, साम टिव्ही

पुणे : पुण्यात शिरूरमध्ये काही दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह आढळले होते. आता या घटनेतील आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. मृत महिला व तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होते. त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यामधील वाद मिटवत असे. त्याचदरम्यान आरोपी गोरख बोखारे आणि मृत स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे याच्याकडेल लग्न करण्याची मागणी करत होती.

आरोपीने मोटरसायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिच्या दोन्ही मुलींना आळंदीतून घेऊन सरहद वाडी शिरूर येथे आला. रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावाजवळ बंद असलेल्या कंपनीत कच्च्या रोडलगत थांबून स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांना गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी १२ दिवसांतच गुन्ह्यातील आरोपीला पकडलं आहे. विशेष बाब म्हणजे, पुणे ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या हातावर असलेल्या जय भीम राजरत्न, मॉम, डॅड आणि आर.एस या टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला.

Shirur burnt bodies of three people
Raj Thackeray: 'मातोश्रीला चाललोय...' राज ठाकरेंनी युतीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाले...

पोलिसांनी २७ कर्मचाऱ्यांच्या टीमसह २५० सीसीटीव्ही तपासून १६ हजार ५०० भाडेकरू कडून माहिती घेतली. ज्याठिकाणी मृतदेह सापडले त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे तपास केला. सहा पथक तयार करून त्यांना तपासला पाठवलं. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक व कोकण परिक्षेत्रात तपास केला. तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमधील ३३ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी कामाला तपास करत होता. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Shirur burnt bodies of three people
Nanded News : आईसोबत मुलगी अन् पुतणी नदीवर, कपडे धुताना अंदाज चुकला, आईसह लेक अन् पुतणी बुडाली; नांदेडमध्ये हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com