
नांदेड : नांदेडच्या उमरी तालुक्यातील भायेगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह एका पुतणीचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. मागासवर्गीय वस्तीवर राहणाऱ्या महानंदा भगवान हणमंते (वय ३५), पायल भगवान हणमंते (वय १३) आणि ऐश्वर्या मालू हणमंते (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या १५ ते २० दिवसापासून वस्तीवरील बोरची मोटर जळाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वस्तीवर पाणी नसल्यानं ह्या तिघीजणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. मात्र, नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दुर्दैवाने या तिघींचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
नागपूरमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू
राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक भीषण अपघात नागपूरमध्ये झाला आहे. मध्यरात्री केटरिंगच्या कामावरुन परतत असताना एका टेम्पो वाहनाला भरधाव दुचाकीची धडक बसली आणि यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. गुरुवारी मध्यरात्री १२.४३ मिनिटांनी ही घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानेवाडा मार्गावर घडली.
नितीन राजेंद्र कटरे (वय १८)आणि आणि कोमल भगवती यादव (वय १७) अशी मृत्तकांची नावं आहेत. हे दोघेही चांगले मित्र मैत्रिणी होते. दोघेही केटरिंगच्या कामासाठी गेले होते. मध्यरात्री घरी परतत असताना काळाने घाला घातला आणि हा भीषण अपघात झाला. मानेवाडा मार्गावर समोरून येणारा टेम्पो हा राईट टर्न घेऊन जात रस्ता ओलांडत असताना, दोघेही भरधाव दुचाकीवरून टेम्पोला धडकले. टेम्पोचालक हा घटनास्थळावरून निघून गेला. दुचाकीवरील दोघांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अजनी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून टेम्पोचालकाचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.