indonesia fire saam tv
देश विदेश

७ मजली इमारतीला भीषण आग, १५ महिलांसह २० जणांचा होरपळून मृत्यू; जकार्तामधील हृदयद्रावक घटना

deadly fire in jakarta building kills 20 : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये हृदयद्रावक घटना घडली. एका सात मजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीत २० हून अधिक नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Nandkumar Joshi

  • सात मजली इमारतीला भीषण आग

  • पहिल्या मजल्यावर लागलेली आग सातव्या मजल्यापर्यंत पसरली

  • १५ महिलांसह २० जणांचा होरपळून मृत्यू

  • इंडोनेशियातील जकार्तामधील घटना

Indonesia Fire Update : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका सात मजली टॉवरला भीषण आग लागली. या आगीत होरपळून २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. आगीच्या ज्वाळांनी सात मजली इमारतीला सर्व बाजूंनी वेढले. धुराचे लोट सगळीकडे पसरले होते.

सेंट्रल जकार्ताचे पोलीस प्रमुख सुसात्यो पुरनोमो कोंड्रो यांनी या आगीच्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत इमारतीतून २० मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यात ५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. मृत महिलांमध्ये एक गरोदर होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या इमारतीत टेरा ड्रोन इंडोनेशियाचे कार्यालय आहे. जे उत्खननापासून कृषी क्षेत्रांतील कंपन्यांसाठी ड्रोन सेवा पुरवते. सध्या या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. अद्याप या इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहिल्या मजल्यावर लागली होती आग

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. काही वेळात आगीनं रौद्ररूप धारण केलं. ती आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली. आग लागली त्यावेळी या कंपनीतील काही कर्मचारी जेवण करत होते. तर काही लोक बाहेर गेले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोम्पास टीव्हीने दाखवलेल्या फुटेजमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू असल्याचे दिसते. अनेक नागरिकांना इमारतीबाहेर काढल्याचे दिसून येते. काही जण पोर्टेबल शिड्यांचा वापर करून वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरवत असताना या व्हिडिओमध्ये दिसून आले.

हाँगकाँगमध्येही लागली होती भीषण आग

इंडोनेशियामधील आगीच्या घटनेआधी हाँगकाँगमध्येही मागील महिन्यात भीषण आग लागली होती. ताई पो जिल्ह्यात ही घटना घडली होती. त्यात जवळपास १६० नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला होता. याच वर्षी ऑगस्टमध्ये इंडोनेशियात संतप्त जमावानं संसद भवन पेटवून दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

Skin care: थंडीमध्ये हाताचं कोपर काळं पडतंय? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

आज चंद्र सिंह राशीत; कोणत्या राशींना मिळणार यश आणि कोणासाठी आहे ‘लकी डे’?

Maharashtra politics : मुख्यमंत्री फडणवीसांचं जाहीर कौतुक, एकनाथ शिंदेंची भविष्यावर नजर? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT