Navi Mumbai Srinagar Indigo flight accident news Saam Tv
देश विदेश

Plane Accident News : नवी मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात, पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक झाली अन्...

IndiGo flight Accident News : श्रीनगर विमानतळावर पार्किंग करताना नवी मुंबईहून आलेले इंडिगोचे विमान VDGS खांबाला धडकले. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असून घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • श्रीनगर विमानतळावर पार्किंग करताना इंडिगोचे विमान VDGS खांबाला धडकले

  • नवी मुंबईहून आलेल्या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत

  • घटनेचा विमानतळावरील नियमित विमान वाहतुकीवर परिणाम झाला नाही

दोहा येथून बेंगळुरूकडे जाणारे इंडिगोचे विमान काल म्हणजे गुरुवारी तातडीने वळवण्यात आले. पायलट आजारी पडल्यामुळे हे विमान वळवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान ही घटना ताजी असतानाच आज जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर शुक्रवारी सकाळी प्रवाशांनी भरलेले इंडिगो विमान पार्किंगदरम्यान खांबाला धडकल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा क्रू मेंबर्सला दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर विमानतळावरील विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून उड्डाणे सुरळीत सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून श्रीनगरला आलेले इंडिगोचे विमान पार्किंगसाठी क्रमांक 6 वर नेण्यात येत होते. याचवेळी विमानाची VDGS च्या खांबाला धडक झाली. ही घटना सकाळी सुमारे 9 वाजून 2 मिनिटांनी घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी विमानात मोठ्या संख्येने प्रवासी होते. मात्र, विमान खांबाला धडकल्यानंतरही कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विमान पार्किंग करताना चूक?

दरम्यान, विमान पार्किंग करताना नेमकी चूक कुठे झाली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या कोणत्याही संभाव्य कारणावर अंतिम निष्कर्ष काढता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

इंडिगोच्या आणखी एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

दोहा येथून बेंगळुरूकडे जाणारे इंडिगोचे 6E 1302 हे विमान पायलट आजारी पडल्यामुळे गुरुवारी मस्कतच्या दिशेने वळवण्यात आले होते. हे विमान ए321 प्रकारचे होते. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अचानक वैद्यकीय मदतीची गरज भासल्याने विमान मस्कत येथे उतरवण्यात आले. विमान उतरल्यानंतर संबंधित सदस्यावर वैद्यकीय पथकाने उपचार केले असून त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. प्रवाशांना बेंगळुरूला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमान आणि नव्या क्रूची व्यवस्था करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये आज आणखी आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Krishna janmashtami 2026: कृष्ण जन्माष्टमीपूर्वी घरी आणा ही 1 वस्तू, सकारात्मक उर्जेसह सुख- समृद्धी नांदेल

WhatsApp Bill Payments: मोठी बातमी! आता Google Pay, PhonePe विसरा; थेट WhatsApp वरूनच भरा वीज-पाण्याचे बिल

वयाच्या 30 नंतर महिलांचे वजन का वाढते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Manoj Jarange : ३ दिवसांत निर्णय न झाल्यास सलाईन-पाणी बंद; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT