Indigo Flight Tickets Saam Tv
देश विदेश

IndiGo Flight : इंडिगोकडून मोठा दिलासा! तब्बल ६१० कोटींची रिफंड प्रोसेस, देशभरात ९५% सेवा पुन्हा सुरू

IndiGo Refunds ₹610 Crore: इंडिगोच्या उड्डाणे रद्द झाल्यानं देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला होता. उड्डाणे रद्द झालेल्या प्रवाशांना कंपनीने तब्बल ६१० कोटींचा रिफंड दिला आहे.

Bhagyashree Kamble

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, अहमदाबाद आणि कोलकाता यांसह देशातील जवळजवळ सर्व प्रमुख विमानतळ रविवारी बस स्थानकांसारखे दिसले. इंडिगोच्या एकामागूम एक उड्डाणे रद्द झाल्याने गोंधळ उडाला होता. इंडिगो कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमुळे ही सेवा ठप्प झाली होती. या संपूर्ण प्रकारानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर, सरकारने वाढत्या विमानभाड्यांना आळा घालण्यासाठी एडवायझरीही जाही जारी केली आहे.

इंडिगोने दावा केला की, ९५ टक्के सेवा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, ३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या या संकटामुळे लाखो लोकांच्या प्लॅन्समध्ये बदल झाले. २००० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यामुळे परिस्थिती अनियंत्रित झाली. प्रवासी देखील संतप्त झाले. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा बहुतेक विमानतळांवर परिस्थिती सामान्य झाली असल्याचे दावा करणारे फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मते, ऑपरेशनल अडथळ्यांनंतर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी इंडिगोने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. इंडिगोने आतापर्यंत एकूण ६१० कोटींची रक्कम रिफंड केली आहे. तसेच प्रवाशांचे सामान पोहोचवण्याचं काम सुरू आहे. देशभरातील ३००० सामान पोहोचवण्यात आलं आहे.

इंडिगोच्या संकटात रेल्वेकडून मदतीचा हात

इंडिगोने प्रवाशांना येणाऱ्या अडचणींमध्ये भारतीय रेल्वे अनेकांसाठी वरदान ठरली आहे. पश्चिम रेल्वेने अहमदाबाद विमानतळावर एक विशिष्ठ तिकीट काउंटर सुरू केले आहे. जिथे उड्डाण रद्द झाल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकीट दिले जात आहेत.

इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्ययामुळे चिपी विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली

इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्ययमुळे चिपी-सिंधुदुर्ग विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. इंडिगो विमान कंपनीच्या व्यत्ययमुळे हवाई वाहतूक क्षेत्रात सध्या अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. कित्येक विमानफेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांनी अन्य विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे. त्याचा फायदा चिपी विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवांना झाला आहे. चिपीहून सद्यस्थितीत 'फ्लाय ९१' कंपनीकडून पुणे, बेंगलोर व हैदराबादकरिता नियमित विमानसेवा सुरू आहे. अन्य वेळीही या सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असतो. त्यातच सध्या सुरू असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या गोंधळामुळे चिपी विमानतळावर येणारी विमाने पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून चिपी विमानतळावर दिवसभरात ४२० प्रवासी दाखल होत असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. तिन्ही शहरांतून येणाऱ्या विमानांच्या तिकिटांची नोंदणी शंभर टक्के होत आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबाद व बंगळुरूहून चिपीकरिता अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच पुणे येथून येणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT