PM Narendra Modi and Donald Trump  saam tv
देश विदेश

India-US Trade: टॅरिफ संकट टळणार! भारत-अमेरिका संबंध ट्रॅकवर; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींविषयी केलं महत्वाचं वक्तव्य

India - US Trade Deal : भारतीय निर्यातीवर लागणारा शुल्क जवळपास ५० टक्क्यांहून घटून १५ ते १६ टक्के केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारताच्या निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारत-अमेरिका यांच्यात करार झाला तर, दोन्ही देशांतील संबंध सुधारू शकतात.

Nandkumar Joshi

  • अमेरिका-भारत संबंध ट्रॅकवर

  • दोन्ही देशांत लवकरच व्यापारी करार

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले महत्वाचे संकेत

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव

भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या विधानामुळं भारत आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेला दुरावा मिटण्याची चिन्हे आहेत. लवकरच भारत आणि अमेरिका या दोन देशांत लवकरच व्यापारी करार (Trade Deal) होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही देशांमध्ये यासंदर्भात सातत्यानं चर्चा सुरू आहे. बऱ्याच मुद्द्यांवर सहमती झाली आहे. त्याचवेळी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांत लवकरच करार होईल, असे ते म्हणाले.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी अनेक विधानं केली. यावरून भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध तुटेपर्यंत ताणले गेले. याशिवाय भारताच्या वस्तूंवर अगडबंब 'टॅरिफ' लादला. भारतानंही अमेरिकेला राजनैतिकदृष्ट्या सडेतोड उत्तर दिले. त्यामुळं काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. पण आता दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. ट्रम्प यांनीच तसे संकेत दिले. लवकरच भारतासोबत व्यापारी करार करणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. दुसरीकडं भारताचीही प्रतिक्रिया आली आहे. व्यापारी कराराच्या दृष्टीने पुढील महिना अत्यंत महत्वाचा असणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संकेत दिले आहेत.

या व्यापारी करारानुसार, भारताच्या काही प्रमुख उत्पादनांवरील आयात शुल्कात (टॅरिफ) अमेरिका मोठी कपात करणार आहे. वृत्तानुसार, भारतीय निर्यातीवर लावण्यात येणारा शुल्क जवळपास ५० टक्क्यांवरून कमी करून तो १५ ते १६ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. परिणामी भारतीय निर्यातीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अद्याप काही संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा व्हायची आहे. भारत रशियाकडून जो कच्चा तेल खरेदी करत आहे, त्यात कपात करावी, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. भारतानंही सकारात्मक विचार केला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत हळूहळू कपात करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडं भारतानंही ठाम भूमिका घेतली आहे. शेतकरी, लहान उद्योग, घरगुती उत्पादकांच्या हिताच्या रक्षणावर भारत आग्रही आहे. विशेषतः शेती आणि डेअरी उद्योगांत अमेरिकी कंपन्यांच्या घुसखोरीला भारताचा विरोध आहे. या स्थानिक उद्योगांना व्यापारी करारामुळं हानी पोहोचू नये, याबाबत सुनिश्चितता हवी आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात जर व्यापारी करार झाला तर, दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारताला अमेरिकेच्या बाजारपेठेपर्यंत बऱ्यापैकी पोहोचता येईल. विशेषतः फार्मा, टेक्सटाइल आणि आयटी या क्षेत्रांना मोठा फायदा होईल. अमेरिकेलाही भारताच्या कृषी, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी मिळू शकतील. शेअर बाजारालाही बुस्टर डोस मिळेल. टॅरिफ १५ ते १६ टक्क्यांपर्यंत आला तर भारतीय बाजारात जबरदस्त तेजी येण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारावर या वर्षाच्या अखेरीपर्यंत स्वाक्षरी होऊ शकते. आगामी काही वर्षांत व्यापार ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं दोन्ही देशांचं लक्ष्य आहे. हा व्यापारी करार या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं. ट्रम्प यांनीही मोदींचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी सर्वात चांगली व्यक्ती आहे. आमचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे, असं ट्रम्प म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT