All About Chandrayaan-3  saam tv
देश विदेश

Chandrayaan-3 Mission Cost : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-3' मोहिमेसाठी आला इतक्या कोटींचा खर्च, आकडेवारी आली समोर

ISRO's Chandrayaan-3 Launch Today: आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Priya More

Chandrayaan-3 Budget News: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची (ISRO) सर्वात महत्वकांक्षी मोहिम 'चांद्रयान- 3' कडे आज संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मोहिमेद्वारे आज इस्रो पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. आज चांद्रयान-3 अवकाशामध्ये झेपावणार आहे.

आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या चांद्रयान मोहिमेसाठी आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. अशामध्ये या मोहिमेसाठी किती खर्च आला आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या मोहिमेसाठी आलेल्या खर्चाची (Chandrayaan-3 Mission Cost) आकडेवारी समोर आली आहे.

भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. यापूर्वी 2008 मध्ये भारताने पहिले चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पाठवले होते. भारताची चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी ठरली होती. भारताने 2019 मध्ये चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत पाठवले होते. चांद्रयान- 2 ही मोहीमही मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली होती. पण चंद्रावर रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.

आता चांद्रयान -3 च्या माध्यमातून इस्रो आणि भारत पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजचा दिवस इस्रोसोबतच भारतासाठी खूपच महत्वाचा असणार आहे. या चांद्रयान - 3 मोहिमेसाठी आलेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे. एखाद्या चित्रपटाच्या बजेटऐवढा खर्च चांद्रयान- 3 मोहिमेसाठी आला असल्याचे सांगितले जात आहे.

चांद्रयान-3 मोहिमेचा एकूण खर्च किती आहे? याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ऐवढंच नाही तर नेमका किती खर्च आला हे जाणून घेण्यासाठी भारतीय खूपच उत्सुक आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार चांद्रयान-3 तयार करण्यासाठी सुमारे 615 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एसएस राजामौली यांचा RRR हा चित्रपट तयार करण्यासाठी 600 कोटी रुपये खर्च आला होता. म्हणजे या चित्रपटाच्या बजेट ऐवढा खर्च चांद्रयान -3 मोहिमेला आला आहे. इस्रोने हे चांद्रयान-3 अतिशय मर्यादित बजेटमध्ये तयार केले आहे. ही देशासाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे.

दरम्यान, चांद्रयान-2 च्या तुलनेनं चांद्रयान-3 मोहिमेसाठी कमी खर्च आला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून फक्त लँडर आणि रोव्हर हे अवकाशात पाठवले जाणार आहे. यापूर्वी इस्रोने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर चांद्रयान-3 मोहिमेत करण्यात येणार आहे. त्यामुळे चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. यापूर्वी चांद्रयान-2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये खर्च आला होता. तर चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे चंद्रायान -3 मोहिमेचा खर्च मागच्या मोहिमेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT