PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर (PM Modi France Visit) आहेत. या दौऱ्यादरम्यान पीएण मोदींना फ्रान्स सरकारने 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या पुरस्काराने (Grand Cross of the Legion of Honour Award) सन्मानित केले आहे. हा फ्रान्समधील सर्वोच्च नागरी सन्मान (France Highest Ciovilian Award) आहे. हा पुरस्कार मिळवणारे पीएम मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France President Emmanuel Macron) यांच्या हस्ते पीएम मोदींना 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जगभरातील मोजके प्रमुख नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीच्या माजी चान्सलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस बुट्रोल घाली यांचा समावेश आहे.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पीएम मोदींना दिलेला हा सन्मान विविध देशांनी त्यांना दिलेल्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींना जून 2023 मध्ये इजिप्तने 'ऑर्डर ऑफ द नाईल', मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीद्वारे 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू', मे 2023 मध्ये फिजीने 'कॅपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी', मे 2023 मध्ये पलाऊ प्रजासत्ताकने 'एबाकल पुरस्कार' याने सन्मानित करण्यात आले.
याआधी रशियाने पंतप्रधानांनी मोदींना 'ऑर्डर ऑफ सेंट अॅण्ड्र्यू' हा पुरस्कार प्रदान केला आहे. 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीने म्हणजेच युएईने 'ऑर्डर ऑफ जायद' पुरस्कार, 2018 मध्ये 'ग्रॅम्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन', 2016 मध्ये अफगाणिस्तानने 'स्टेट ऑर्ड ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान' आणि 2016 मध्ये सैदी अरेबियाने 'ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापुरस्कारांपूर्वी देखील मोदींना अनेक देशांकडून पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.
फ्रान्सला जाण्यापूर्वी मोदींनी अमेरिकाचा दौरा केला होता. पीएम मोदींचा फ्रान्सचा हा दौरा खूपच महत्वपूर्ण मानला जात आहे. फ्रान्स दौऱ्यावर असणाऱ्या मोदींसाठी एलिसी पॅलेसमध्ये विशेष डिनरचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या डिनरचे आयोजन केले होते. मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फ्रान्समध्ये मोदींच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले होते. तसंच, फ्रान्समधील भारतीयांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.